पुणे

मावळात २.३० लाखांची म्हैस खरेदीने गावात जल्लोष

CD

वडगाव मावळ, ता. १६ : मावळ तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथील दुग्ध व्यावसायिक व म्हशीचे व्यापारी बाबाजी शिंदे यांनी तब्बल २ लाख ३० हजार रुपये किमतीची उच्च प्रतीची म्हैस खरेदी करत तिची वाजत गाजत थाटामाटात मिरवणूक काढली. पारंपरिक शेतीसोबत दुग्धव्यवसायाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटत असताना शिंदे यांनी केलेली ही खरेदी पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे.
शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून म्हशी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी ७० हजार रुपये ते दीड लाख रुपये किमतीच्या म्हशी खरेदी केल्या होत्या. मात्र त्यांनी नुकतीच उत्तम दूध उत्पादन क्षमता असलेली म्हैस २ लाख ३० हजार रुपये मोजून खरेदी केली. ही म्हैस गिर जाफरा जातीची असून दिवसाला १६ लिटर दूध देण्याची तिची क्षमता आहे. खरेदीचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी आकर्षक सजावट करून म्हशीची गावातून पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली. गाडा मालक व उद्योजक अतुल वायकर व मित्र परिवाराच्या वतीने शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. योग्य नियोजन, दर्जेदार जनावरे आणि मेहनत यांच्या जोरावर ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य साध्य करता येते, याचे उदाहरण बाबाजी शिंदे यांनी घालून दिले आहे, अशी प्रतिक्रिया वायकर यांनी व्यक्त केली. दुग्धव्यवसायातून नियमित व चांगले उत्पन्न मिळत आहे. ही म्हैस आमच्या कुटुंबाच्या कष्टाचे प्रतीक आहे अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''हिंदूंना मत देणं म्हणजे हराम..'', मौलानाचा व्हिडीओ व्हायरल; निवडणुकीपूर्वी विधान, मंदिरांबाबतही वक्तव्य...

Accident News: दुर्दैवी! सुट्टीवरून परतणाऱ्या शिक्षकांवर काळाचा घाला; दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

Sanjay Kelkar: ...वेळ पडली तर आम्ही वेगळा विचार करू, ठाणे पालिकेच्या विजयानंतर भाजप आमदारांचा इशारा

Pune One Sided Love Case : 'तू मला हो म्‍हण नाहीतर...'; पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीला घरात शिरून मारहाण!

मनोज वाजपेयी नाही तर चिन्मयने झेंडे सिनेमासाठी आधी केलेली या अभिनेत्याची निवड; "त्याच्यासारखी चर्चा.."

SCROLL FOR NEXT