daund 
पुणे

पुण्यातील या भागात सततच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका 

सावता नवले

कुरकुंभ (पुणे) : दौंड तालुक्यातील खडकी, कुरकुंभ, मळद परिसरातील गावांमध्ये सततच्या पावसाने जमिनीत पाणी साचून राहिले. त्यातून शेतकऱ्यांच्या कांदा, भुईमूग, बाजरी, भाजीपाला व ऊस पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे.

दौंड तालुक्यातील कुरकुंभ, मळद, पांढरेवाडी, जिरेगाव,  कौठडी, नंदादेवी, खडकी, स्वामी चिंचोली, रावणगाव परिसरात यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी उघडीप व जमीन वाफशावर येताच बाजरी व कांदा पेरणी करण्यात आली. तसेच, भाजीपाला, ऊसलागवड  करण्यात आली. काही शेतकऱ्यांच्या भुईमूग काढणीस आला. मात्र, पावसामुळे काढणीत व्यत्यय आला. त्यामुळे भुईमुगाच्या शेंगा कुजणे, करे (कोंब) आल्याने नुकसान झाले. तर, बाजरी व कांदा पेरणी केल्यानंतर जमिनीत पाणी साचून राहिल्याने बियाणे उगविले नाही. त्यामुळे मशागत, बियाणे वाया गेल्याने आर्थिक फटका बसला असून, वेळ व हंगाम वाया गेला. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही बियाणाची उगवण झाली नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत.

बहुतांश शेतकऱ्यांनी पाऊस चांगला झाल्यामुळे जून व जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली. मात्र, त्यानंतर सततच्या पावसाने ऊस लागवड केलेल्या जमिनीत पाणी साठल्याने व लवकर निचरा न झाल्याने उसाचे कोंब सडले व उगवणही झाली नाही. त्यामुळे बेणे, ऊस लागवडीची मजुरी, मशागत, खते, असा एकरी 18 ते 20 हजार रूपये नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीतील पाण्याचा निचरा झाल्यानंतर पुन्हा ऊस लागवड करावी लागणार आहे. पाणी साचल्याने भाजीपाल्याची पिके सडल्याने उत्पादन घटले आहे. मागच्या वर्षी पाऊस वेळेवर न झाल्याने, तर यंदा सततच्या पावसाने नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पाऊस चांगला झाल्याने जमिनीला वाफसा येताच बाजरी पेरली. मात्र, बियाणाची उगवण अत्यंत कमी प्रमाणात झाली. त्यामुळे दुबार पेरणी केली, तर जमिनीत पाणी साचून राहिले. त्यातून पुन्हा नुकसान झाले. ऊस लागवड केलेल्या शेतात पाणी साठल्याने नुकसान झाले.
 - रघुनाथ काळे
शेतकरी, खडकी (ता. दौंड) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT