farmer.jpg 
पुणे

कांदा सडतोय...शेतकरी रडतोय

पराग जगताप

ओतूर (पुणे) : खराब हवामानामुळे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कांद्याला गळीतही कमी निघाले असून, चाळीत साठवणूक केलेला कांदा वातावरणातील बदलामुळे लवकर खराब होऊ लागला आहे. त्यामुळे कांदा सडतोय अन् शेतकरी रडतोय, अशी शेतकऱ्याची अवस्था झाली आहे, अशी खंत ओतूर (ता. जुन्नर) येथील कांदा उत्पादक शेतकरी बाळासाहेब महादेव डुंबरे यांनी व्यक्त केली.         

शेतकऱ्यांनी चांगल्या बाजारभावासाठी कांदा साठवणूक केली आहे. परंतु, ५० टक्के कांदा सडून खराब झाला आहे. त्याची प्रतवारीही खराब झाली आहे. चांगल्या कांद्याला आता कुठेतरी समाधानकारक बाजारभाव मिळू लागला होता. त्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत धरसोड व विचित्र धोरण राबवून व्यापाऱ्यांत घबराट निर्माण करून कांद्याचे दर पाडण्याचा काम केले आहे. मात्र, साठवणूक केलेला कांदा जास्त खराब झाला आणि नवीन कांदा मार्केटमध्ये कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढत आहे.

याबाबत महादेव डुंबरे यांनी सांगितले की, अंदाजे ३०० पिशवी साठवणूक केला होता. त्यातील आता फक्त १२० पिशवी राहिली असून, कांदे खराब होत असल्याने मिळेलत्या भावात ओतूर बाजारात भूगी बदले दोन ते चार रुपये, तर चांगले कांदे ७ रुपयांपासून १४ रुपये किलोपर्यंत विक्री केले. 
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

खराब वातावरणामुळे चाळीत साठवणूक केलेला कांदा जास्त प्रमाणात सापडत असल्याने व नवीन कांदा बाजारात यायला वेळ असल्याने जुन्या चाळीत साठवणूक केलेल्या कांद्याला चांगला बाजार मिळत आहे. अजूनही बाजारभाव वाढण्याची आशा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची गुणवत्ता पाहून टप्प्याटप्प्याने कांदा विकून अधिकच्या बाजारभावाचा फायदा घ्यावा. 
 - बाळासाहेब होनराव, आडतदार, ओतूर (ता. जुन्नर)
 

 

कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला, तर पुढील कांदा लागवडीचा भांडवली खर्च भागेल. त्यातच कांदा बी तीन ते चार हजार रुपये किलोने मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी भाव वाढूनही कांदा सडल्याने व भांडवली खर्चात वाढ झाल्याने अडचणीत आला आहे. त्यामुळे सरकारने कांद्याला तीस रुपये हमीभाव जाहीर करावा. जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही.
 -  बाळासाहेब महादेव डुंबरे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT