velhe taluka  Sakal Media
पुणे

पुणे : तौक्ते वादळाने वेल्हे तालुक्यात नुकसान

तोरणा किल्ल्यावरील अंबरखाना व राजगडावरील पर्यटक निवासाचे पत्रे उडाले

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे (पुणे) : तौक्ते वादळाने वेल्हे तालुक्यात घरांच्या भिंती, छप्पर, किल्ले तोरण्यावरील अंबरखाना तर राजगडावरील पर्य़टक निवासाचे पत्रे उडाले. अशी माहिती वेल्ह्याचे तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. काल (ता. १६) सकाळपासून वातावरणात ढगाळ झाले होते तर दुपारी वा-याचा जोर वाढल्याने रात्री वादळी वा-यासह जोरदार पाऊस तालुक्यात पडल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडली होती. किल्ले तोरण्यावरील अंबरखान्याचे पत्रे उडाले असून, लक्कड खान्याचे किरकोळ नुकसान झाले होते. लक्कडखान्याची उचकटलेली लाकडे येथील कर्मचारी ओंमकार सांगळे, राजेंद्र बोराणे यांनी बसविली.

किल्ले राजगडावरील पर्यटक निवासाचे पत्रे उडाले असल्याची माहिती येथील किल्लेदार दादु वेगरे यांनी दिली. वेल्हे तालुक्याच्या पश्चिमेला व रायगड जिल्ह्यालगत असणा-या केळद, बार्शीमाळ, गेळगाणी, खानु येथील डिगे वस्ती या गावांतील घरांवरील व ओसरीवरील छप्पर उडाली असून, पुर्वेकडील किरकोळ खरीव येथील नथु बाबुराव शिंदे यांच्या घराची पडझड, कादवे येथील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे व कातकरी कुटुंबातील घराचे छप्पर उडाले असल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली असून येथील स्थानिक जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी या परिसराची पाहणी केली आहे.

पानशेत लवासा रोडवरील बीएसएफ कॅम्प रस्ता व आडवली गावाकडे जाणारा रस्ता झाड पडुन रस्ता बंद झाला होता, परंतु येथील नागरीक व आडवली गावचे तरुण कार्येकते मोहन काटकर यांनी तत्परतेने झाड बाजूला करुन रस्ता मोकळा करुन दिला असल्याची माहिती वेल्हेचे साहय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली. वेल्हे तालुक्यामध्ये महावितरणचे लघुदाब वाहिनीचे पासली येथील तीन, कोंळबी येथील दोन तर बार्शीमाळ येथील सहा तर घावर येथील एक असे एकुण बारा पोल पडले आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी तत्परतेने काम करीत असल्याची माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश गिते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईतील निकालानंतर किरीट सोमैय्यांनी राज ठाकरेंना डिवचलं, काय म्हणाले? वाचा...

Kolhapur Election Party Wise Winners : कोल्हापूर महानगरपालिका पक्षनिहाय विजयी उमेदवार लिस्ट, जाणून घ्या पक्षीय बलाबल

MBMC Results: मीरा-भाईंदरमध्ये भाजप मोठ्या फरकाने सत्तेत येणार! इतर पक्षांना मोठा फटका; जाणून घ्या विजयी उमेदवारांची यादी

ना राधा पाटील ना दीपाली सय्यद; 'या' सदस्याला मिळालीत सगळ्यात जास्त मतं; पाहा 'बिग बॉस मराठी ६'चा व्होटिंग ट्रेंड

Kharmas Restrictions: खरमास संपला तरी विवाह-गृहप्रवेशावर निर्बंध का? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT