rain sakal media
पुणे

वादळी पावसामुळे पूर्व हवेलीतील गावांमध्ये नुकसान

जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

उरुळी कांचन : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह अष्टापूर व परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने शनिवारी (ता. २९) सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तास पडलेल्या पावसामुळे शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांना या पावसाचा लाखो रुपयांचा फटका बसला. तर ३०० पेक्षा जास्त कोंबड्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अष्टापूर येथील पोल्ट्री व्यावसायिक माणिक कोतवाल यांच्या पोल्ट्रीवरील सिमेंटचे पत्रे उडून सुमारे 500 फूट अंतरावर जाऊन पडले. यामुळे त्यांचे सुमारे चार लाखापेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे. तर कैलास कोतवाल यांच्या घरातील पत्रे उडून सुमारे 1500 फूट अंतरावर जाऊन पडले. तसेच गावातील जुन्या घराच्या भिंतीसुद्धा पडल्या आहेत.

शिरसवडी येथील दिनेश कोतवाल यांच्या 300 पेक्षा जास्त कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्या पोल्ट्रीफार्मचे पत्र्याचे शेडही उडून गेले आहे. त्यांचे सुमारे तीन लाखापेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे. तर कोरेगाव मूळ येथील गोळीबार मैदान परिसरातील महालक्ष्मी कॉलोनीमध्ये सहा घरांचे पत्रे उडुन गेले आहेत. तर एका लहान मुलाच्या डोक्यात विट पडून किरकोळ दुखापत झाली आहे. यामुळे वादळी वाऱ्यासह पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, पूर्व हवेलीत विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह दीड तास गारपीट झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. तर काही भागात वीजपुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा तुटल्या. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली आहे. मान्सूनपूर्व पाऊस हा मशागतीसाठी चांगला झाला आहे. परंतु, गारपिटीमुळे शेतातील मका, पालक, मेथी, कोथिंबीर व इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

मान्सूनपूर्व पडलेल्या पावसामुळे हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे, पोल्ट्री व्यावसायिकांच्या शेडचे आणि नागरिकांच्या घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार हवेली तालुक्यात नुकसानग्रस्त नागरिकांचे त्वरित पंचनामे करण्यात येणार आहेत आणि पंचनामे केलेला अहवाल कृषी आयुक्तालयात सादर केल्यानंतर प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना लवकरच नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

-अशोक पवार, आमदार, शिरूर-हवेली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

SCROLL FOR NEXT