Dange-Chowk-Traffic
Dange-Chowk-Traffic 
पुणे

डांगे चौकातून पुण्याकडे जाताना वाहतूक कोंडी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - रस्त्यालगत उभी असणारी वाहने, प्रवासी घेण्यासाठी थांबणाऱ्या रिक्षा अशा अनेक कारणांमुळे डांगे चौकातून पुण्याकडे जाणाऱ्या सेवारस्त्यावर वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडू लागली आहे. वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे सेवारस्त्यावरील वाहतूक अडचणीत सापडली आहे. 

चिंचवडमधून येणारे वाहनचालक औंधकडे जाण्यासाठी डांगे चौकातील सेवारस्त्याचा वापर करतात. या चौकामध्ये सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. दरम्यान, या सेवारस्त्याची अवस्था बिकट झाली असून गाडी चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर संध्याकाळच्या वेळी खासगी ट्रॅव्हलच्या बस प्रवासी घेण्यासाठी उभ्या असतात; त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. 

औधकडे जाणाऱ्या जगताप डेअरी चौकातील उड्डाणपूल अद्याप वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना वळसा मारून जावे लागते. उड्डाण पुलाच्या परिसरातील सेवारस्ता पूर्णपणे उखडला असल्याने वाहनचालकांना या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

नागरिक म्हणतात...
डांगे चौकातील सेवारस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या सेवारस्त्याची दुरुस्ती करण्याची आवश्‍यकता आहे. याबरोबरच सेवारस्त्यावर अनधिकृतपणे पार्किंग करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची गरज आहे. 
- शेखर देशपांडे

सेवारस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्‍यता आहे. या ठिकाणी उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहनचालकांच्या सुरक्षेचा विचार करून महापालिकेने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची आवश्‍यकता आहे. 
- रवींद्र पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PVR Inox: T20 विश्वचषकासाठी पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा प्लॅन; चित्रपटांनी निराश केल्यावर घेतला 'हा' निर्णय

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT