date for consumer forum cases after the Four months.jpg 
पुणे

कोरोनामुळे ग्राहक मंचातील दाव्यांना मिळणार ४ महिन्यानंतरची तारीख

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : कोरोनाचा ग्राहक मंचाच्या कामकाजावर देखील परिणाम झाला असून तक्रारदारांना न्याय मिळण्यास आता आणखी उशीर होणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मंचात दाखल असलेल्या दाव्यांना तब्बल चार महिन्यानंतरच्या तारखा देण्यात आल्या आहेत.

तुम्हाला माहित आहे का? पुण्यात दारु मिळविण्यासाठी मिळताहेत पैसै

लॉकडाउन सुरू झाल्यापासून ग्राहक मंचाचे कामकाज देखील बंद आहे. त्यामुळे दाव्यांना  पुढील तारीखा देण्यात आल्या होत्या. मात्र लॉकडाउन सलग तीनदा वाढल्याने प्रलंबित दाव्यांना थेट सप्टेंबर महिन्यांमधील तारखा देण्यात आल्या आहेत. ग्राहक संरक्षण अधिनियम 1980 मधील कलम 24 (ब) च्या अधिकारानुसार याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे दावा दाखल केल्यापासून 90 दिवसांच्या आत ग्राहकांना न्याय द्यावा, हा ग्राहक मंचाचा नियम पाळणे शक्य होणार नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशीच स्थिती राष्ट्रीय ग्राहक मंचाची असून तेथील प्रकरणांना दीड महिन्यानंतरच्या तारखा देण्यात आल्या आहेत. तात्काळ प्रकरण असल्यास न्यायालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 वाजताच ते सादर करावे, असे परिपत्रक राष्ट्रीय ग्राहक मंचाचे संयुक्त रजिस्टर एस. हनुमंता राव यांनी काढले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दाव्याच्या निमित्ताने मंचात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. संबंधित व्यक्ती कुठल्या भागातून आला हे शोधणे अवघड असते. त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लांबच्या तारखा देण्यात आल्या आहेत. तसेच दररोज सुनावणी होणाऱ्या दाव्यांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आपोआप गर्दी कमी होईल व संसर्ग वाढणार नाही, अशी माहिती मंचाकडून देण्यात आली.

पुण्यातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीने दिली कोरोनाला जबरदस्त टक्कर

''गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी रोजच्या सूनवणींची संख्या कमी करून लांबच्या तारखा देण्यात आल्या आहेत. तातडीच्या दाव्यावर मात्र सुनावणी होणार आहे. जुन्या प्रकरणांना लवकर तारखा द्याव्या, अशी मागणी होत आहे. त्याचा देखील विचार केला जाणार आहे.''
- उमेश जावळीकर, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच

पुणे : आता ऑनलाईन मिटींगसाठी 'वेबीनार'ची धूम; एकदा वापरून पाहाल तर...​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: मुंबई पुणेकरांनो सावधान! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Pune Police : घराचा धागा पुन्हा जुळला; पोलिसांनी तरुणीला दिला मायेचा आधार

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

...तोपर्यंत नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, बाळ्या मामांचा सरकारला इशारा, नेमकी अट कोणती?

Asia Cup 2025: 'बुमराह जर UAE विरुद्ध खेळला, तर आंदोलन करेल', माजी भारतीय क्रिकेटपटूने कंल जाहीर

SCROLL FOR NEXT