pune sakal
पुणे

राज्याची तिजोरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात ; दत्तात्रय भरणे ...

सन २०१२ पर्यंत कामे कमी व उदघाटने जास्त होत होती. आता कामे जास्त होत आहेत.

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : राज्याची तिजोरी उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ताब्यात असून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी (development) विक्रमी निधी आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रुसवेफुगवे, गटतट बाजूस ठेवून पक्षसंघटन (organization) मजबूत करण्यास प्राधान्य द्यावे. खोड्या करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूस ठेवणे गरजेचे असून रुसवे फुगवे करणाऱ्या कार्यकर्त्यांनी घरी बसावे असा इशारा देत सामान्यप्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattātraya bharaṇe) यांनी आगामी निवडणुकांसाठी (elections) रणशिंग फुंकले.

झगडेवाडी ग्रामपंचायत सचिवालय, अंगणवाडी, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, अंतर्गत रस्ते, विविध मंदिर सभा मंडपाचे उदघाटन तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी जिल्हापरिषद सदस्य प्रविण माने, हनुमंत बंडगर, प्रताप पाटील, प्रशांत पाटील,सचिन सपकळ, महारुद्र पाटील, हनुमंत कोकाटे, अमोल पाटील, दिलीप वाघमारे, दत्तात्रय जगताप, सागर मिसाळ उपस्थित होते.

श्री. भरणे पुढे म्हणाले, सन २०१२ पर्यंत कामे कमी व उदघाटने जास्त होत होती. आता कामे जास्त होत आहेत. मात्र आपण प्रसिद्धीस कमी पडत आहे. त्यामुळे कार्य कर्त्यांनी आता जास्त वाजवणे गरजेचे आहे. अनेक तोलामोलाचे कार्यकर्ते पक्षात येण्यास उत्सुक असून आता बेरजेचे राजकारण करणेगरजेचे आहे. त्यामुळे जिल्हापरिषद,पंचायत समिती व नगरपरिषद ताब्यात येण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करणे गरजेचेआहे. तालुक्यातील वीज तोडणी संदर्भात राज्याचे वीज मंत्री नितीन राऊत यांच्याशीसकारात्मक चर्चा झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ८०० कोटी रुपयांच्या निविदा दि. १० सप्टेंबर पर्यंत निघणार आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासास निधी कमी पडणार नाही

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, इंदापूर तालुक्यात शेती, गाणे, व्हॅन तयार करणे यामध्ये प्रचंड बौद्धिक संपदा असून त्याचे मार्केटिंग होणे गरजेचे आहे.इंदापूरतालुक्याचे आगामी २५ व ५० वर्षाचे बिझनेस मॉडेल तयार करणे गरजेचे असून तालुक्यातीलटॅलेंट ला वाव देण्यासाठी कटिबद्ध आहे.

यावेळी जिल्हापरिषद सदस्य अभिजिततांबिले ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, सरपंच रुपाली झगडे यांची भाषणे झाली. स्वागत उपसरपंच यशोदा राजगुरू तर सुत्रसंचलन अनिल रुपनवर व संतोष गदादे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT