पुणे

पुण्यात आईकडून मुलीला मारहाण; दोन दिवस ठेवले उपाशी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एका 12 वर्षाच्या मुलीला तिची आई व मावशीने स्वयंपाकाच्या भांड्याने मारहाण केले. त्याचबरोबर मुलीला दोन दिवस उपाशी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या आजीने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बोपोडी येथे 20 नोव्हेंबरला घडली. 

याप्रकरणी भवानी पेठेतील हरकानगर येथे राहणाऱ्या 52 वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन पीडित मुलीची आई व मावशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मुलाचे लग्न बोपोडी येथील तरुणीशी झाला होते. त्यानंतर त्यांना एक मुलगीही झाली. दरम्यान, दोघांमधील भांडणामुळे त्यांची सून तिच्या बोपोडी येथे राहणाऱ्या आई-वडिलांकडे गेली. जाताना मुलीलाही आपल्यासमवेत नेले. मुलीने आपल्याला वडिलांकडे जायचे आहे, इथे राहायचे नाही, असे तिच्या आईला सांगितले. त्यावरुन चिडून तिच्या आईने तिला स्टीलच्या उलथनाने मुलीच्या हातावर मारहाण केली. तर मावशीनेही शिवीगाळ करीत मुलीला हाताने मारहाण केली.

तसेच या दोघींनी मुलीला दोन दिवस उपाशी ठेवले आणि चार दिवस आंघोळीला पाणी दिले नसल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराबाबत फिर्यादी यांना खबर मिळाली, त्यानंतर त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

"हम मजदूर आदमी हैं", मोहम्मद शमीने पुन्हा निवड समिती प्रमुख अजित आगरकरला टोमणा हाणला, आता हा वाद आणखी पेटणार?

Latest Marathi News Live Update: MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला

'आता एवढंच राहिलं होतं!' कॉमेडियन समय रैनानं उडवडी बिग बी अमिताभ बच्चन यांची खिल्ली, म्हणाला...'पोलिओच्या जाहिराती केल्या पण...'

Konkan Satyashodhak Parishad:कोकण विभागीय सत्यशोधक परिषद : फुले-दि. बा. पाटील-आंबेडकर शताब्दी वर्षांच्या औचित्याने सामाजिक क्रांतीचा वैचारिक मेळावा

SCROLL FOR NEXT