The daughter of the deputy commissioner of police posted a Video message about Corona via Facebook.jpg 
पुणे

हम होंगे कामयाब एक दिन ! पोलिस उपायुक्तांच्या मुलींनी कोरोनाबाबत दिला 'असा' संदेश...एकदा बघाच

सकाळवृत्तसेवा

पुणे: शरयू व शर्वरी या दोघीही नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी. त्यांचे वडील पोलिस उपायुक्त मितेश घट्टे आपल्या हजारो पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यासह कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. मग त्यांच्या दोन मुली तरी मागे कशा राहतील. मग ठरल, दोघीनी स्वत: कोरोनाबाबत जनजागृती करणारा संदेश देणारा व्हिडिओ फेसबुकद्वारे  "हम होंगे कामयाब एक दिन" असा दुर्दम्य विश्वास ही व्यक्त केला. त्यांच्या या संदेशाची दस्तुरखुुद्द गृहमंत्री अनिल देशमुख व जयंत पाटील यांनी दखल घेत त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे पोलिस दलामध्ये विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त म्हणून मितेश घट्टे सध्या कार्यरत आहेत.उपायुक्त घट्टे हे देखील आपल्या अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह कोरोना विरुद्धची लढाई खंबीरपणे लढ़त आहेत. पोलिस अधिकारी असल्यामुळे वडिलांचे दररोजचे काम त्यांच्या दोन्ही मुलींना चांगलेच ठाऊक आहे. 

रेशनकार्डाच्या नियमात केंद्राकडून बदल; तब्बल एवढ्या लोकांना होणार फायदा 

विशेषत: सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलिस दिवस रात्र रस्त्यावर उभे राहुन लढा देत असल्याचे या मुलींच्या नजरेतुन तरी कसे सुटेल. गेली दोन महीने ते हे सर्व पाहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये नववीमध्ये शिकणाऱ्या शरयू व शर्वरी या दोघीनीही संपूर्ण पोलिस दलाला आणि कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या आरोग्य, जिल्हाधिकारी प्रशासनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: पुढाकार घेण्याचे ठरविले. त्यासाठी शरयू व शर्वरी या दोघीनी कोरोनाबाबत जनजागृती करणारा आणि नागरीकांनी घरात थांबावे, असे आवाहन करणारा व्हिडिओ तयार केला. तसेच या व्हिडिओद्वारे "हम होंगे कामयाब एक दिन" अशा शब्दात दुर्दम्य विश्वास ही व्यक्त केला. हा व्हिडिओ त्यानी फेसबुकवर अपलोड केला. त्यानंतर पुणे पोलिस दलातुन शरयू व शर्वरीचे चांगलेच कौतुक झाले.

मोठी बातमी : रांगेत न थांबता दारू मिळणार; पुण्यात ई-टोकनला सुरवात!

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या व्हिडिओची दखल घेत त्यांच्या फेसबुक पेजवरुन त्याचे भरभरुन कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील त्यांच्या फेसबुकवर हा व्हिडिओ घेऊन शरयू व शर्वरीचे कौतुक केले.

बाप रे ! पुण्याने ओलांडला कोरोनाग्रस्तांचा तीन हजारांचा टप्पा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT