daund former corporator shahanawaj khan
daund former corporator shahanawaj khan sakal
पुणे

Daund News : दौंड नगरपालिकेच्या माजी नगरसेवकाला रूग्णालयात लाथाबुक्क्यांनी तुडवून केले जखमी

प्रफुल्ल भंडारी

दौंड - पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिकेच्या एका माजी नगरसेवकास पराभूत उमेदवाराकडून रूग्णालयात लाथाबुक्क्यांनी तुडवून जखमी करण्यात आले आहे. प्रभागातील गटारीच्या कामावर देखरेख करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून झालेल्या या प्रकरणात दौंड पोलिसांनी सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे गटार योजनेचे काम सुरू असून ८ एप्रिल रोजी दौंड शहरातील नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडीचा माजी नगरसेवक शहानवाज इब्राहिम खान - पठाण (रा. महात्मा गांधी चौक जवळ, दौंड) व त्याचा सहकारी अरीफ लतीफ बागवान हे दोघे तेथे आले होते.

त्या दरम्यान या प्रभागातून मागील नगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अकबर सय्यद याने त्यांना हटकून तुम्ही येथे कशाला आला?, असे विचारल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले व अरिफ बागवान याच्या पायावर लोखंडी फावडा मारण्यात आल्याने त्यास उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान जखमी अरिफ बागवान याने या प्रकाराची पोलिस ठाण्यात फिर्याद देऊ नये , याकरिता अकबर सय्यद याचे काही सहकारी त्यास दुपारी रूग्णालयात दमदाटी करीत होते. सदर दमदाटी प्रकरणी शहानवाज खान याने त्याच्या सहकार्यांसह रूग्णालयात जाऊन विचारणा करताच अकबर सय्यद व त्याच्या सहकार्यांनी लोखंडी पाइपने मारहाण करीत शहानवाज याला लाथाबुक्क्यांनी तुडविले. दुखापत करून शिवागीळ करण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दौंड पोलिसांनी शहानवाज खान याच्या फिर्यादीनुसार अकबर सय्यद, अजहर अकबर सय्यद, मोईनुद्दीन फरीद शेख उर्फ मोन्या, निसार खान, तलहा हबीब सय्यद, जुबेर अकबर सय्यद व अरबाज अकबर सय्यद (सर्व रा. खाटीक गल्ली, दौंड ) यांच्याविरूध्द बेकायदेशीर जमाव करणे, दंगा करणे, घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत पोचविणे, शांतताभंग करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT