Farmers Facing drought
Farmers Facing drought esakal
पुणे

रिकाम्या तलावांमुळे बळिराजा हवालदिल

सकाळ वृत्तसेवा

यवत : मुसळधार पाऊस आणि महापूराने (flood) राज्यात (maharashtra) काही ठिकाणी जनजीवन विस्कळित केले असले तरी दौंड (daund) तालुक्याच्या जीरायती भागातील बहुतांश तलाव अद्याप रिकामेच आहेत. पावसाने दडी मारल्याने बळिराजा हवालदिल झाले आहेत. यामुळे शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात कोकणासाह (kokan) अनेक ठिकाणी पावसाने आहाकार माजवला आहे. दौंडसह आसपासच्या तालुक्यांमध्ये मात्र पावसाने दडी मारली आहे. (daund taluka farmer waiting rain)

दौंड तालुक्याची ओळख बागायती श्रेत्र, ऊस शेतीचा तालुका म्हणून असली तरी याच तालुक्यात पश्चिमेकडील डाळींबपासून दक्षिणेकडील रोटी, हिंगणीगाडा गावापर्यंत मोठा जिरायती भाग आहे. या भागात काही उचल पाण्याचे क्षेत्र सोडले तर बाकी क्षेत्र प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. वळवाच्या पावसाने हे तलाव काही प्रमाणात भरले आणि त्यानंतर आषाढ श्रावणातल्या सरींमुळे भुलेश्वर डोंगर रांगामधून फुटलेले पाझर यांमुळे हे तलाव तुडूंब भरतात. या भागातील पद्मावती तलाव (खोर), गावठाण तलाव (भांडगाव) कासुर्डी तलाव (कासुर्डी) या तलावांमध्ये काही प्रमाणात पाणी आहे.

पद्मावती तलावात जनाई उपसा योजनेचे पाणी सोडले असल्याने त्यात समाधानकारक साठा आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीच्या काळात हे तलाव भरले तर जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे विहिरींना चांगले पाणी राहते. या भागातील कांदा, तरकारी व इतर हंगामी पिकांना त्याचा चांगला फायदा होतो.

या तलावांना पावसाची प्रतीक्षा

विठ्ठलबन तलाव (डाळिंब), ताम्हाणावाडी तलाव (ताम्हाणवाडी), थोरातवाडी तलाव (भरतगाव), डोंबेवाडी तलाव (खोर), टेमजाई, गजाला तलाव (वाखारी)

"पुरंदर उपसा सिंचन योजनेची कुपटेवाडी वितरिका दौंडच्या दुष्काळी पट्ट्यातून गेली आहे. उन्हाळ्यात या योजनेच्या पाण्याला (दूषित असूनही) मोठी मागणी असते. तेव्हा नदीला पाणी कमी असते. आता नदीतून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शासनाने स्वखर्चाने ही योजना सुरू ठेवावी. त्याद्वारे पुरंदर व दौंड तालुक्यातील तलाव भरतील व यामुळे या भागाची पाण्याची गरज भागेल," असे दौंड पंचायत समितीचे सदस्य सुशांत दरेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएमची केली होती पूजा

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT