daund railway 
पुणे

"एमपी'च्या मजुरांना महाराष्ट्राची गोडी, गावी जाण्यास नकार... 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : परप्रांतीय मजुरांना घेऊन विशेष श्रमिक एक्‍स्प्रेस दौंडवरून मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरकडे निघाली, मात्र ऐनवेळी 400 जणांनी जाण्यास नकार दिला. त्यामुळे पूर्वनिर्धारित वेळेपेक्षा 47 मिनिटांच्या विलंबाने एक्‍स्प्रेस रवाना झाली. 

दौंड तालुक्‍यातील कुरकुंभ एमआयडीसी, दौंड शहर, यवत, पाटस, राहू, आदी भागातील 1206 मजुरांना श्रमिक एक्‍स्प्रेसने मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरकडे पाठविण्याचे महसूल प्रशासनाने नियोजन केले होते. परंतु, नोंदणी केलेल्यांपैकी अनेकांनी "एमआयडीसी'मधील कंपन्या सुरू झाल्याने जाण्यास नकार दिला, तर काही जण गावाकडे निघून गेले होते. 9 मे रोजी तयारी करताना प्रशासनाला या गोष्टी निदर्शनास आल्या. त्यामुळे त्यांनी तालुक्‍याच्या अन्य भागातील 400 मजुरांच्या याद्या मागवून फेरनियोजन केले. त्यानुसार आज (ता. 10) या मजुरांना बसगाड्यांमधून दौंड रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. 

नियोजित वेळेनुसार 24 डब्ब्यांची ही एक्‍स्प्रेस सायंकाळी 5 वाजता रवाना होणार होती, परंतु काही मजुरांचे कुटुंबीय वेळेवर न पोचल्याने विलंब झाला. गाडीत एकूण 1172 नागरिक स्थानापन्न झाल्यानंतर 5 वाजून 47 मिनिटांनी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी या एक्‍सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला.

तहसीलदार संजय पाटील, गट विकास अधिकारी गणेश मोरे, स्थानक व्यवस्थापक सॅम्युएल क्‍लिफ्टन, वाहतूक निरीक्षक आर. बी. सिंग, रेल्वेचे सहायक समादेशक बी. के. गंगोपाध्याय, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, दीपाली भुजबळ, तेजप्रकाश पाल, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, सहायक निरीक्षक युवराज कलकुटगे, रेल्वे वाणिज्य विभागाचे सतीश सोनोने आदी या वेळी उपस्थित होते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

या एक्‍स्प्रेसचे मुख्य लोको निरीक्षक एस. एच. शितोळे, चालक लक्ष्मीकांत दुरुगकर, सहायक चालक आशिष सिंग आहेत; तर गार्ड एच. डी. आहिरे आहेत. महसूल प्रशासनाकडून त्यांना जेवण आणि पाणी देण्यात आले. ही श्रमिक एक्‍स्प्रेस 1214 किलोमीटरचे अंतर 17 तासांचा प्रवास करून 11 मे रोजी ग्वाल्हेरला पोचणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Case : चेतनच्या कृत्यामुळे कुटुंब धास्तावले; फ्लॅटला कुलूप लावून रातोरात झाले पसार!

US-Iran Conflict: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! इराणविरोधातील लष्करी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकी सिनेटमध्ये मंजूर

Jamun Sharbat: पावसाळ्यातला थकवा दूर करतं जांभळाचं हे खास सरबत; एकदा प्याल तर पुन्हा पुन्हा मागाल

Baramati AI Farming: बारामतीचा आवाज थेट संयुक्त राष्ट्रांपर्यंत! शेतकऱ्यांसाठी विकसित ‘एआय’ संशोधनाची रोममधील जागतिक परिषदेसाठी निवड

Monsoon Rain Alert Maharashtra : मॉन्सूनचे ढग आणखी दाटले, मुंबई, गोवा, किनारपट्टीवर पावसाची शक्यता; ७ राज्यात पावसाने जोर धरला

SCROLL FOR NEXT