On the day of bhaubij young man chased and attacked on the brother in Waraje 
पुणे

भाऊबीजेच्या दिवशी राडा; मानलेल्या बहिणीशी बोलल्याचा जाब विचारल्याने तरुणाचा पाठलाग करून वार

सकाळवृत्तसेवा

पुणे : भाऊबीजेच्या दिवशी मानलेल्या बहिणीशी बोलल्याचा जाब विचारला म्हणून एका तरुणावर टोळक्‍याकडून कोयत्याने वार करीत, पाठलाग करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास वारजे येथे घडली. 

याप्रकरणी सागर काळेकर (वय 23, रा. वारजे नाका, वारजे) याने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर काळेकर याने एका तरुणीला बहिणी मानलेली आहे. दरम्यान, फिर्यादीच्या मानलेल्या बहिणी आरोपी बोलत असल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे फिर्यादीने आरोपीच्या वाहनाला त्याची दुचाकी आडवी लावून "तू माझ्या बहिणीबरोबर काय बोलत होतास' असा जाब विचारला होता.
 

आरोपीने या घटनेचा राग मनात धरून त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले आणि त्यानंतर सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी व त्याचे आठ साथीदार फिर्यादी राहात असलेल्या वारजे येथील आचार्य सोसायटीमध्ये आले. त्यांनी फिर्यादीस गाठून त्याच्यावर कोयत्याने वार केला, मात्र फिर्यादीने कोयत्याचा वार चुकवून तो खाली वाकला. त्यामुळे कोयत्याचा वार तेथील लोखंडी बाकड्यावर बसला. त्यानंतर फिर्यादी तेथून पळून जाऊ लागले, त्यावेळी आरोपींनी त्यांचा पाठलाग करीत, "आज याला सोडायचा नाही, खल्लास करून टाका याला' अशी धमकी देत जोरजोरात शिवीगाळ व आरडाओरडा करीत परिसरामध्ये दहशत निर्माण केली. या प्रकारामुळे भाऊबीजेसाठी परिसरात आलेल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हे वाचा - दिवाळीत घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना अटक; 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

फिर्यादीच्या नातेवाइकांसह स्थानिक नागरिकांनी भीतीपोटी घराचे दरवाजे बंद करून घेतले. आरोपींनी तेथून जाताना फिर्यादी यांच्या चुलत्याच्या दुचाकीच्या टाकीवर कोयत्याचे वार करून दुचाकीचे नुकसान केले. त्यामध्ये दुचाकीचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT