विद्याधर अनास्कर  sakal
पुणे

Pune : सभासदांकडील कर्जाची वसुली होणार गतिमान

राज्यातील नागरी सहकारी बॅंका, पतसंस्थांच्या कर्जदार सभासदांकडे थकीत असलेल्या रकमेची वसुली प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने सध्याच्या नियमातील अडचणी दूर करणार आहेत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील नागरी सहकारी बॅंका, पतसंस्थांच्या कर्जदार सभासदांकडे थकीत असलेल्या रकमेची वसुली प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने सध्याच्या नियमातील अडचणी दूर करणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या बैठकीत राज्य सरकारकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यापुढील काळात थकबाकीदारांकडील वसुली जलदगतीने करणे सहकारी संस्थांना शक्य होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरी सहकारी बॅंका, पतसंस्थांच्या कर्जदारांकडील थकीत कर्ज आणि गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांकडील थकीत मेंटेनन्सच्या वसुलीसाठी अनेक अडचणी येत होत्या. महाराष्ट्र सहकारी कायदा कलम १०१ अंतर्गत मिळणाऱ्या वसुलीच्या दाखल्याला लागणाऱ्या विलंबामुळे ही प्रक्रिया अडचणीची झाली होती. या पार्श्वभूमीवर वसुली दाखले देण्याची प्रक्रिया सुटसुटीत आणि जलदगतीने पार पडावी, अशी मागणी नागरी सहकारी बॅंका, पतसंस्था आणि गृहनिर्माण संस्था फेडरेशनकडून करण्यात येत होती.

‘सकाळ माध्यम समूहा’ने नुकत्याच घेतलेल्या सहकार महापरिषदेत नागरी सहकारी बॅंका आणि पतसंस्थांच्या फेडरेशनने त्यांच्या विविध अडचणी मांडल्या. त्यावेळी बॅंका आणि पतसंस्थांनी कर्जवसुली प्रक्रियेचा मुद्दाही उपस्थित केला होता. या संदर्भात परिषदेत महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी संबंधित फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सहकार परिषदेच्या कार्यालयात अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

सहकार खात्याचे विभागीय उपनिबंधक महेश कदम, ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत कानिटकर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते, महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे, उपाध्यक्ष सुहास पटवर्धन, महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सायली भोईर, पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांच्यासह इतर फेडरेशनचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

"न्यायालयीन निवाड्यांचा परामर्श घेत कलम १०१ अंतर्गत होणारी वसुली प्रक्रिया जलद करण्याच्या दृष्टीने कायदा व अधिनियमात या बैठकीत अनेक बदल सुचविले. परंतु सद्यःस्थितीत केवळ नियमातील बदलांवरच लक्ष केंद्रित करणार आहे. सध्या नियमातील अडचणींच्या ठरणाऱ्या तरतुदींची कारणमीमांसा करून ठोस उपाययोजना करण्याबाबत आवश्यक तरतुदींचा स्वतंत्र अहवाल राज्य सरकारकडे पाठविणार आहे. या बदलांमुळे कर्जवसुलीच्या प्रक्रियेस लागणारा विलंब टळणार असून, ही प्रक्रिया जलद होणार आहे."

- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT