Deccan-College
Deccan-College 
पुणे

डेक्कन कॉलेजकडे 'मॉडल' विद्यापीठ म्हणून पहावे : डॉ. भूषण पटवर्धन

सकाळवृत्तसेवा

पुणे - 'डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ हे देशातील जून्या विद्यापीठातील एक असून या संस्थेत भारतीय प्राचीन इतिहास आणि भारतीय प्राचीन ज्ञानावर आधारीत अभ्यास केला जात आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात या ज्ञानाला विशेष महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतीय ज्ञान देणारे 'मॉडल' विद्यापीठ म्हणून डेक्कन कॉलेजकडे पहायला हवे.", असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, संस्कृत अशा विषयांमधील संशोधनामुळे आंतरराष्ट्रीय पातळी लौकिक मिळवलेले डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाने मंगळवारी २०० व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. पटवर्धन बोलत होते. यावेळी ऑनलाइनद्वारे झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलपती डॉ. ए. पी. जामखेडकर, विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर, प्रभारी कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी, डॉ. पी.डी. साबळे, डॉ. तृप्ती मोरे आदी मान्यवर सहभागी झाले होते. 

डॉ. पटवर्धन म्हणाले,"या अभिमत विद्यापीठाने आपल्या ज्ञानशाखा अधिकाधिक विस्तारल्या पाहिजेत. त्यासाठी विद्यापीठातील प्राध्यापक, युवा संशोधक यांनी पुढाकार घ्यायला हवा. ह्यूमॅनिटीज विषयावर संशोधन होण्याची गरज असताना, त्यावर फारसे संशोधन होताना दिसत नाही. या विद्यापीठाने त्यावर गांभिर्याने संशोधन करण्यासाठी पावले उचवावीत.'

'विद्यापीठ अनुदान आयोगाने या विद्यापीठाला विशेष विद्यापीठाचा दर्जा  द्यावा', अशी मागणी डॉ. देगलूरकर यांनी आपल्या भाषणातून केली. तसेच त्यांनी विद्यापीठाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. डॉ. जामखेडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

संस्थेचे 'द्वि शताब्दी' वर्ष साजरे करताना वर्षभर प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्त्व, भाषाशास्त्र आणि संस्कृत व कोशशास्त्र या विषयांवर व्याख्याने, संशोधकांच्या लघुग्रंथमालेचे प्रकाशन, विविध कार्यशाळा असे कार्यक्रम घेतले जाणार आहेत, असे डॉ. जोशी यांनी यावेळी सांगितले.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain: कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; 'या' जिल्ह्यात लवकरच कोसळणार

Sharad Pawar : "बालबुद्धीने बोलतात.." आमदारावर टीका करणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी फटकारले

Hardik Pandya: 'हार्दिकच्या नेतृत्वात अहंकार जाणवतो, तो धोनीसारखा...' एबी डिविलियर्सचं MI कॅप्टनबाबत खळबळजनक भाष्य

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरसह कागल परिसरात जोरदार पाऊस सुरु

Heeramandi The Diamond Bazar : ना सोनाक्षी ना मनीषा, 'या' व्यक्तीनं घेतलं सर्वाधिक मानधन; 'हिरामंडी' बजेट किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT