soical-media 
पुणे

...त्याने अखेर सोशल मीडियाचा कमी वापर करण्याचे ठरविले

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘हे रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर ॲक्‍टिव्ह असतात... घरी आल्यानंतर माझ्याशी नीट बोलत नाहीत... त्यांना मित्र-मैत्रिणीच जवळच्या झाल्या आहेत,’ अशी तक्रार करीत पत्नी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात गेली. मात्र, दोघांचेही आणि खासकरून पतीचे समुपदेशन झाल्यानंतर त्याने अखेर सोशल मीडियाचा कमी वापर करण्याचे ठरविले. त्यामुळे सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणारा घटस्फोट टळला.

‘मी दिवसभर ऑफिसला असतो. काम करून बोअर होतो; म्हणून मित्र-मैत्रिणींशी बोलतो. मला त्यांना वेळ देता येत नाही. तेदेखील महत्त्वाचे आहेत ना,’ अशी भूमिका या वादावर आयटीत काम करणाऱ्या रोहनने घेतली होती; तर पत्नी ललिता (दोघांचीही नावे बदलली आहेत.) हिच्या लक्षात आले की, पती घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत फोनला चिकटून असतो. सतत सोशल मीडियाचा वापर करतो. या सर्व बाबी तिने सासू-सासऱ्यांना सांगितल्या. ‘घरी लक्ष देत जा. कामावरून आल्यावर पत्नीला वेळ दे,’ असे त्यांनी मुलाला समजावले. त्यामुळे त्यांच्यातील वाद तात्पुरता मिटायचा. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. त्यामुळे त्याची पत्नी वेगळी राहू लागली व तिने घटस्फोटाचा दावा दाखल केला. 

हा दावा कौटुंबिक न्यायालयातील मीडिएटर (मध्यस्थ) ॲड. प्रगती पाटील यांच्याकडे समुपदेशनासाठी आला. ‘केवळ टाइमपास करणारे मित्र-मैत्रीण संसार नाही करू शकत. कुटुंबासाठी आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. मित्रपरिवार प्रत्येक वेळी आपले घर सांभाळणार नाहीत. त्यासाठी पत्नीच गरजेची असते,’ असे ॲड. पाटील यांनी रोहितला समजावले. ‘तुझा पती थोडा सोशल आहे. त्यामुळे त्यावर सतत संशय घेऊ नको. त्याने सोशल मीडियाचा वापर कमी करण्याचे ठरविले आहे,’ असे ललिता यांना सांगण्यात आले. त्यानंतर पतीला काही अटी टाकल्यानंतर ते  पुन्हा एकत्र आले.

मुळात दोघांत मोठा वाद नव्हता. पत्नी बॅंकेत नोकरी करते. त्यामुळे तिला वाटायचे की घरी आल्यानंतर पतीने आपल्याशी गप्पा कराव्यात. कोणत्याही गोष्टीला काही रेषा असतात. या रेषा दिसत नाहीत. पण, त्या पाळल्या पाहिजेत. संशय येईल असे आपण वागूच नये, असे त्यांचे समुपदेशन करण्यात आले. 
- ॲड. प्रगती पाटील, मीडिएटर

या अटींवर  टिकला संसार
    घरी आल्यानंतर पत्नीला वेळ देईन
    खूप गरज असेल तेव्हाच फोनचा वापर 
    ठरावीक वेळेनंतर मोबाईल बंद 
    घरात चांगले लक्ष देईन
    गैरसमज होतील, असे दोघेही वागणार नाहीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT