Banks-closed 
पुणे

पुणे जिल्ह्यातील या ठिकाणच्या बँका- पतसंस्था बंद ठेवण्याचा निर्णय

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचर परिसरात कोरोनाचे तीन रुग्ण बुधवारी (ता. 8) दिवसभरात मिळाले. त्यामुळे येथील रुग्ण संख्या 11 झाली असून, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीची उपाय म्हणून शहरातील बँका पतसंस्था तूर्त काही दिवस पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

बँक, पतसंस्था चालू ठेवल्यास ग्राहकांची गर्दी होते, याचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील आदेश येईपर्यंत बँका, पतसंस्था बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याची माहिती मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली. यासंदर्भात काल प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी यांनी बँक सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. आता पुन्हा या परिसरात बँका व पतसंस्था पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.     

दरम्यान, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील गावांमधून पुणे, रांजणगाव किंवा इतर कोणत्याही औद्योगिक क्षेत्रांमध्ये नोकरी आणि इतर कोणत्याही कारणास्तव दररोज ये-जा करणाऱ्या व्यक्तींनी आपले कुटुंब गृह विलगीकरणामध्ये ठेवावे, या आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार शिक्षेस पात्र राहील, असा इशारा डुडी यांनी दिला आहे.    

मंचर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या गुरुवारपर्यंत अकरा झाली असून, त्यामध्ये सहा पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे.  चाकण, रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात किंवा पुणे या ठिकाणी दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आणि विविध वाहनांवर चालक असलेल्या नागरिकांनी स्वतःला गृह विलगीकरण करावे. कामानिमित्त इतर ठिकाणी जाणाऱ्यांनी घरात राहताना कुटुंबापासून विभक्त राहुन कुटुंबातील कोणी व्यक्ती आपल्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच, दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आपली नोंदणी ग्रामपंचायत कार्यालयात करणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांनी 99 75 39 39 47, 86 0049 97 या नंबरवर संपर्क करून आपली नोंदणी करावी. नोंदणी अथवा गृह विलगीकरण न करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.

Edited By : Nilesh Shende
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT