पुणे

पुणे महानगरपालिका घेणार कार्डिऍक ऍम्ब्युलन्स;स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात पावणेदोन लाख लोकांना कोरोना झाला; त्यातील सुमारे साडेचार हजार जणांना जीव गमवावा लागल्यानंतर आता कुठे महापालिका आपली उपचार यंत्रणा अधिक सक्षम करीत आहे. अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारासाठी "कार्डिऍक ऍम्ब्युलन्स' खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी घेतला. या रुग्णवाहिकेसाठी तब्बल 32 लाख रुपये खर्च होणार आहे. 

कोरोनाची साथीत ही सुविधा उपलब्ध होणार असून, पहिल्या टप्प्यात आता एक रुग्णवाहिका घेतली जाईल. ती संपूर्ण शहरासाठी वापरण्यात येणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. कोरोनाच्या साथीत अत्यवस्थ रुग्णांना तातडीच्या आणि नेमक्‍या उपचारासाठी "कार्डिऍक ऍम्ब्युलन्स' ची गरज भासत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, अशा रुग्णांची संख्या वाढूनही महापालिकेकडे ही व्यवस्था नसल्याने काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. रुग्णालयापर्यंत पोचताना पुरेशा क्षमतेने ऑक्‍सिजन न मिळाल्याने काही रुग्णांना मृत्यूही झाला आहे. खासगी रुग्णालयांकडील कार्डिऍक ऍम्ब्युलन्स अपुऱ्या ठरल्या. त्यात या रुग्णवाहिकेचे दरही परवडत नसल्याने सामान्यांना ती उपलब्ध होऊ शकली नाही. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडे अशा रुग्णवाहिकेची सोय असावी, अशी अपेक्षा नागरिकांची होती. त्यानुसार ती खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला. 

सराफी व्यावसायिकाचा पिस्तुलातुन गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

मात्र, आरोग्य खात्याला वर्षाकाठी सुमारे साडेतीनशे-चारशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होता. त्यातून ही सोय करणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून फुटकळ कामांवरच आरोग्य खात्याचा खर्च होत असल्याचे चित्र आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची साथ कमी झाली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील स्थिती पाहता आता तातडीने "कार्डिऍक ऍम्ब्युलन्स' घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT