पुणे

नदीत अस्थी विसर्जन टाळून वृक्षारोपणाचा निर्णय; आळंदी म्हातोबा ग्रामस्थांचे होतेय कौतुक 

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : आपल्या प्रियजणांचे अस्थी किंवा रक्षा विसर्जन करताना आपण अतिशय संवेदनशील असतो. प्रिय जणांच्या अस्थी विसर्जीत करताना शक्यतो नदीपात्रात व अथवा वाहत्या पाण्यात करतो. हे करण्यामागे आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजणांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी हा सारा प्रपंच असतो. मात्र याला अपवाद ठरले आहे, ते आळंदी म्हातोबा (ता. हवेली) या गावातील शिवरकर परिवार. यामुळे ग्रामस्थ व शिवरकर कुटुबियांचे कौतुक होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या परीवाराने पारंपारीक गोष्टींना फाटा देत, आपल्या प्रविण या ३२ वर्षीय तरुण मुलाच्या अस्थी पाण्यात सोडण्याऐवजी वृक्षारोपणासाठी वापरल्या आहेत. प्रविण याच्या नावाने घऱाशेजारी देशी स्वरूपाचे एक झाड लावून, त्याच्या मुळाशी प्रविणच्या अस्थी विसर्जीत करण्यात आल्या आहेत. त्यातून पुढील काही वर्षात एक मोठा वृक्ष नव्या पिढीला सावली आणि फळे देईल आणि प्रविणची आठवणही पुढील पिढीला होत राहील.

आळंदी म्हातोबा गावचे प्रगतशील शेतकरी पांडुरंग दगडू शिवरकर (वय  62) यांचे विस दिवसांपुर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. शिवरकर कुंटुब या दुःखातून सावरत असतानाच, पांडुरंग शिवरकर यांचा थोरला मुलगा, प्रविण (वय ३२) याचे गुरुवारी (ता. ८) अल्पशा आजाराने निधन झाले. वीस दिवसांच्या आत घरातील दोघेजण सोडून गेल्याने, शिवरकर कुंटुब दुःखात बुडाले होते. प्रविणचा अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रक्षा (अस्थी) विसर्जीत करण्याचा कार्यक्रम होणार होता.

दरम्यान, मृत्युपुर्वी प्रविण याने काही दिवसांपुर्वी वृक्षारोपण संवर्धन समितीच्या माध्यमातून नदी प्रदूषण रोखण्यासाठी माणसाच्या निधनानंतर रक्षा (अस्थी) नदीत विसर्जित न करता त्या खोल खड्ड्यात घेऊन त्यात टाकाव्यात व त्यावर एक वृक्ष लागवड करावी असा उपक्रम राबविण्यासाठी ग्रामस्थांना सुचवले होते व स्वतःच्या वडीलांच्या अस्थी पाण्यात विसर्जीत न कराता, घराशेजारी खड्डा खोदुन व त्यावर वृक्ष लागवड करुन केल्या होत्या. अशा प्रविणच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम करण्याची वेळ शिवरकर कुंटुबावर आली होती. मात्र अशा वेळी प्रविण याचा छोटा भाऊ, जिवन पांडुरंग शिवरकर व शिवरकर कुंटुबांचे जावई बापूसाहेब गिरमे यांनी प्रविण याच्या रक्षा पाण्यात विसर्जित न करता घराशेजारी एका खड्ड्यात विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. 

प्रविण शिवरकर कुंटुबांच्या वरील निर्णयाला आळंदी म्हातोबाची वृक्षारोपण संवर्धन समितीचे अध्यक्ष संदिप शिवरकर, सदस्य संतोष शिवरकर, तेजस शिवरकर, सचिन शिवरकर यांनी पाठींबा दिला. त्यानुसार वृक्षारोपण संवर्धन समितीच्या वतीने प्रविण याच्या घऱाजवळच एक खड्डा खोदण्यात आला व त्या खड्ड्यात प्रविणची आई, रत्नमाला, पत्नी (अश्विनी), बहीण (स्वाती बापूसाहेब गिरमे) यांच्या प्रमुख साक्षीने देशी स्वरूपाचे एक झाड लावण्यात आले. खड्ड्यामध्ये वृक्ष लावून त्यामध्ये प्रविणची अस्थी विसर्जीत करण्यात आली. तसेच यावेळी समितीच्या वतीने आपल्या घरातील मृत व्यक्ती आपणास सदैव आठवणीत रहावी आणि त्या वृक्षापासून पर्यावरणाचे व नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मदत करावी यासाठी अस्थीचे विसर्जण पाण्याऐवजी वरील पद्धतीने करावे यासाठी उपस्थितांचे प्रबोधनही करण्यात आले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

SCROLL FOR NEXT