Maratha_Reservation 
पुणे

Maratha Reservation: EWSचा निर्णय स्वागतार्ह; भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेतील उमेदवारांचे म्हणणे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (EWS) आरक्षण राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत विविध विभागातील पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी केले आहे. मात्र, निदान आता तरी पदभरती प्रक्रियेला वेग मिळावा, अशी अपेक्षाही उमेदवारांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे. 

समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी घेतलेला हा निर्णय निश्‍चितच स्वागतार्ह असल्याचे काही उमेदवारांचे म्हणणे आहे. एमपीएससी स्टुडंटस राईट्‌सचे किरण निंभोरे म्हणाले, "मराठा आरक्षणाला आतापर्यंत स्थगिती होती. मात्र आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (EWS) आरक्षणाचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे पदभरतीमध्ये 'ईडब्ल्यूएस'च्या 10 टक्के आरक्षणाचा फायदा उमेदवारांना होऊ शकणार आहे. हा निर्णय निश्‍चित स्वागतार्ह आहे.''

तर डी.टी.एड, बी.एड. स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष संतोष मगर म्हणाले, "मराठा समाजातील अनेक उमेदवारांना शिक्षक भरती दरम्यान निदान आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (EWS) आरक्षण मिळावे, अशी मागणी सातत्याने होत होती. राज्य सरकारच्या निर्णयामुळे या उमेदवारांना फायदा होणार आहे. परंतु आता पदभरती असो वा प्रवेश प्रक्रिया याला आता विनाअडथळा गती मिळणे आवश्‍यक आहे.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT