Ajit-Pawar 
पुणे

पुण्यातील गणेश मंडळांचा 'तो' निर्णय स्वागतार्ह; राज्यातील सर्व गणेश मंडळांना उपमुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्याचं सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या पाच आणि काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधी, सदस्यांचं अभिनंदन केलं आणि आभारही मानले आहेत. 

राज्यावरील कोरोनाचं संकट पाहता पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही या निर्णयाचं अनुकरण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे शहरानं नेहमीच सामाजिक चळवळींचं नेतृत्व केलं असून, समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं आहे. पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरी वाडा या मानाच्या गणपती मंडळांनी, तसंच भाऊ रंगारी मंडळ, श्रीमंत दगडुशेठ गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ व अन्य गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आणि सार्वजनिक हिताच्यादृष्टीने महत्वाचा निर्णय आहे.

विशेष म्हणजे हा निर्णय घेण्यासाठी झालेली बैठक देखील ‘ऑनलाईन’ झाली. सार्वजनिक उत्सव साधेपणानं साजरा करत असताना महापालिका व पोलिस यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करण्याचा घेतलेला निर्णयही कौतुकास्पद आहे. पुण्यातील सार्वजनिक मंडळांच्या प्रतिनिधींनी दाखवलेलं हे समाजभान कौतुकास्पद आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्थींचं पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचा हा निर्णय सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल. राज्यातील अन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही यातून प्रेरणा, प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: लवकरच उन्हापासून दिलासा मिळणार! महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन कधी होणार? अखेर तारीख आली समोर

YouTube Upload Issue: जगभरातील क्रिएटर्स हैराण! यूट्यूबवर व्हिडिओ अपलोडिंगमध्ये अडचण, नेमकं कारण काय?

सहाव्यांदा कर्करोगाशी झुंज देतेय द फॅमिली मॅन मधील तळपदेची पत्नी ! अभिनेत्याने केलं कौतुक

Air India: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! २९ आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणांत मोठी कपात; एअर इंडियाचा मोठा निर्णय, जाणून घ्या यादी...

Fuel Crisis: मोदी बोलले, एकनाथ शिंदेंनी अस्तित्वात आणले, सरकारी ताफ्यातील वाहनं कमी करून दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरले

SCROLL FOR NEXT