daund 
पुणे

"एसआरपीएफ'च्या या जवानांसाठी घेतलाय हा निर्णय 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : मुंबई येथे बंदोबस्त करून परतलेल्या राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातमधील 110 जवानांपैकी 8 जणांचा वैद्यकीय अहवाल कोरोना संशयित रुग्ण म्हणून आला आहे. त्यामुळे त्यांच्या पुन्हा स्वॅब टेस्ट करून स्वॅब तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. संशयित जवान 27 ते 35 या वयोगटातील आहेत. 

राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली एस. खान यांनी याबाबत माहिती दिली की, मुंबई येथून 16 मार्च रोजी बंदोबस्त करून दौंड येथे परतलेल्या तुकडीतील 110 जवानांना गटाचे समादेशक श्रीकांत पाठक यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांच्या घरी न पाठविता एसआरपीएफ कॅंपमधील अष्टविनायक मंगल कार्यालयात क्वारंटाइन केले होते. दररोज त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात होती. परंतु, राज्य राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालिका अर्चना त्यागी यांच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांची मुंबई येथील एका खासगी वैद्यकीय संस्थेकडून स्वॅब टेस्ट (कापसाच्या आधारे गळ्यातून किंवा नाकातून स्वॅब सॅंपल घेणे) करण्यासाठी सॅंपल चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. 

सदर खासगी संस्थेचा अहवाल आज (ता. 30) प्राप्त झाला असून, त्यानुसार आठ जण कोरोना संशयित आहेत. परंतु, शासन निर्देशानुसार त्यांचे नव्याने सॅंपल घेऊन ते राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी जातील. शनिवारी (ता. 2 मे) राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून प्राप्त अहवालानुसार पुढील वैद्यकीय कार्यवाही केली जाणार आहे, असे डॉ. वैशाली एस. खान यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT