Ajit Pawar Sakal
पुणे

बारामतीत निर्बंध शिथील करण्याबाबत दोन दिवसात घेणार निर्णय

बारामती शहरातील निर्बंध शिथील करण्याबाबत जो पर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा दर पाच टक्क्यांहून खाली येत नाही तो वर निर्णय घेण्याबाबत अनिश्चितता आहे.

- मिलिंद संगई

बारामती - शहरातील (Baramati City) निर्बंध शिथील करण्याबाबत जो पर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा (Corona Infection) दर पाच टक्क्यांहून खाली येत नाही तो वर निर्णय (Decision) घेण्याबाबत अनिश्चितता आहे. पुढील दोन दिवसांच्या रुग्णांची स्थिती पाहून प्रशासनाने (Administrative) निर्बंध आणखी शिथील करायचे किंवा नाही या बाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिली. (Decision will be Taken in Two Days to Relax the Restrictions in Baramati)

बारामतीत झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही सूचना दिली. बारामतीतील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे या बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले मात्र शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे पाच टक्क्यांहून बाधितांची संख्या कमी होत नाही, तो पर्यंत निर्णय घेताना अडचणी येत आहेत.

या बैठकीत पवार यांनी यावेळी शहरासह तालुक्यातील कोरोना व म्युकर मायकोसिस प्रादुर्भावाची सद्यस्थिती, उपाययोजना, लहान बालकांसाठीच्या वैद्यकिय सुविधा, लसीकरण, आॅक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदींचा आढावा घेतला.

ते म्हणाले, कोरोनानंतर म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याची लक्षणे, काळजी, उपचार यांची माहिती सर्वदूर पोहोचवावी. जनजागृती करावी. तसेच म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या इंजेक्शनचे योग्य नियोजन करावे. कोणत्याही परिस्थितीत कान, नाक, घसा तसेच इतर लक्षणे जाणवताच तातडीने रुग्णालयात जावून नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT