exam 
पुणे

विद्यापीठांच्या परीक्षांसंदर्भात आज निर्णय होण्याची शक्‍यता 

सकाळवृत्तसेवा

पुणे - "कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. पुढील काळात परीक्षा कशा घ्याव्यात व यासाठी काय तयारी केली आहे, याचा आढावा घेण्यासाठी आज (ता.6) राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. 

यामध्ये उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्यातील 13 विद्यापीठांचे कुलगुरू, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने सहभागी होणार आहेत. पुणे विद्यापीठाने 'लॉकडाउन'मुळे सर्व परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. तसेच, कितीही विलंब झाला तरी कोणतीही परीक्षा रद्द न करता सर्व परीक्षा होतील, परंतु त्यांचे स्वरूप बदलले जाईल, असे स्पष्ट केले आहे. 

राज्यातील इतर विद्यापीठांमधील परीक्षा झालेल्या नाहीत, त्यांनी परीक्षांचे कसे नियोजन केले आहे, याचा आढावा घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ही बैठक सोमवारी होणार आहे. या बैठकीत महाविद्यालय परीक्षा वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन, ऑनलाइन अध्यापन प्रणालीचा वापर यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षा वेळापत्रकासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC News : महापालिकेत नगरसेविकांच्या पतींची अति लुडबूड; अधिकाऱ्यांना दमबाजी, मनमानी कारभार

'कूर्गी स्त्रिया सुंदर असतात आणि मी अशाच एकीशी लग्न केलंय': रश्मिकासाठी विजय देवरकोंडाचं गोड वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल, Viral Video

चक्क 9000mAh बॅटरीवाला OnePlus Nord 6 लाँच! परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स, सर्वकाही पाहा एका क्लिकवर

Mumbai: मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये बिबट्यांची शिकार, दात आणि इतर अवयव काढून...; ६ आरोपींना अटक

Mcoca Crime : सोळा टोळ्यांतील ७९ गुंडांवर ‘मकोका’; पिंपरी चिंचवड पोलिसांची तीन महिन्यांतील कारवाई

SCROLL FOR NEXT