Declaration of ten thousand to traders still remain on paper only  
पुणे

पथारी व्यावसायिकांना दिलासा नाहीच! केंद्र सराकारची 'ती' घोषणा कागदावरच 

सकाळवृत्तसेवा

पुण : पथारी व्यावसायिकांना व्यवसायासाठी दहा हजार रुपयांचे भांडवल देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली खरी, परंतु महिना होत आला. प्रत्यक्षात ही मदत मिळालेलीच नाही. त्यामुळे ही घोषणा कागदावरच राहिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या भांडवलाची वाट न पाहता अनेक व्यावसायिकांनी पैशांची जुळवाजुळव करून तर काहींनी उधारी करून करण्यास सुरवात केली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शहरातील पथारी व्यावसायिकांना बसला. हातावर पोट असणाऱ्या या व्यवसायातील अनेकांची कुटुंब उद्‌ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. गेल्या महिन्यात 14 मे रोजी केंद्र सरकारने पथारी-हातगाडी व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा हजार रुपयांची भांडवल देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे अनेक पथारी व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. परंतु ही घोषणा करून त्यास 23 दिवसांहून अधिक काळ झाला. अद्याप ही मदत मिळालेली नाही. ती कधी आणि कशी मिळणार यांची माहिती देखील पथारी व्यवसायिकांपर्यंत पोचलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारची ही घोषणा सध्या तरी कागदावरच राहिली आहे.

अमोल कोल्हे म्हणतात, कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवली पाहिजे

सरकार देईल तेव्हा देईल, परंतु पुन्हा व्यवसाय सुरू करून कुटुंबाची गाडी रूळावर आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी व्याजाने, उधारी करून पैसे जमा करून व्यवसायास सुरू करण्याची धडपड पथारी व्यावसायिकांनी सुरू केली आहे. 

अरे बापरे, पुणे- नगर रस्त्याचे काम अर्धवट सोडून कंत्राटदार गायब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT