corona logo1.jpg 
पुणे

शिरुरकरांसाठी दिलासादायक बातमी : तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) : गेल्या आठवड्यात रूग्ण संख्येचा विस्फोट झालेल्या शिरूर तालुक्याला आता कोरोनाच्या प्रादुर्भातून काहीसा दिलासा मिळत असून, गेल्या आठ दिवसांत रूग्ण संख्या टप्प्याटप्प्याने कमी होत चालल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात तालुक्यातील आठ गावांतील २२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, शहरात एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 
 

गेल्या रविवारी तालुक्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येचा विस्फोट होऊन एकाच दिवशी ५२ जणांना बाधा झाली होती. त्यानंतर ४९, ४७, ३५, ३२, २६, २५ अशा दैनंदिन टप्प्याने रूग्ण संख्येचा वेग उतरत गेला. त्यामुळे तालुक्याच्या सर्वच भागाला काहीसा दिलासा मिळाला. शहरातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. एकाच घरातून चार ते आठपर्यंत व्यक्तींना बाधा झाली होती. त्यापैकी बरेच जण ठणठणीत होऊन घरी परतले असून, येथील रेव्हेन्यू कॉलनी परिसरातील एका साठ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 
 

शिक्रापूर येथे आज सलग तिस-या दिवशीही कोरोनाचा कहर कायम असून, आजही एका दिवसात तेथे सात रूग्ण आढळले. त्याखालोखाल कोरेगाव भीमा येथे चार, सणसवाडीत तीन, तळेगाव ढमढेरे व रांजणगाव गणपती येथे प्रत्येकी दोन आणि इनामगाव, वढू बुद्रूक व कासारी येथे प्रत्येकी एक रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली.

शिरूर शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १५५ झाली असून, तालु्क्यातील बाधितांची संख्या ७०९ झाली आहे. शिक्रापूर, सणसवाडी हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून, तेथे दैनंदिन रूग्णांची संख्या तालुक्यातील इतर भागांच्या तुलनेत अधिक आहे. हा औद्योगिक पट्टा असून, कारखानदारी सुरू झाल्याने व या परिसरातील विविध कारखाने व कंपन्यांतून कामासाठी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील हॉटस्पॉट मधून कामगार येत असल्याची माहिती असून, प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. -
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SME Growth Fund : लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटींचा 'एसएमई ग्रोथ फंड'; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Sanchar Saathi Milestone : सायबर फसवणुकीविरोधात नागरिक बनले ‘योद्धा’! ‘संचार साथी’ पोर्टलने ओलांडला ३० कोटी भेटींचा टप्पा

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT