Deepak Humber's report will be sent to the Director General of Police.png
Deepak Humber's report will be sent to the Director General of Police.png 
पुणे

दीपक हुंबरे यांचा रिपोर्ट पाठवणार डीजींकडे; पोलिस आयुक्तांची माहिती

सकाळवृत्तसेवा

पुणे :''विशेष शाखेत असलेले सहायक पोलिस आयुक्त दीपक हुंबरे यांच्याविरुद्ध सातारा येथे खंडणीचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळाली आहे. त्याबाबतचा अहवाल सातारा पोलिसांकडून आल्यावर तो पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल,'' अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी बुधवारी दिली.

बारावीचा अभ्यासक्रम बदललाय; असे झाले बदल...

हुंबरे यांच्याविरुद्ध ४० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील भुईज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंबरे यांच्या विरोधात असलेल्या अनेक तक्रारींमुळे त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. मात्र सक्तीच्या रजेवर असताना देखील गणवेश घालून त्यांनी आरोपींला अटक न करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ४० हजार रुपये स्वीकारले आहेत. याप्रकरणी एका २२ वर्षाच्या तरुणाने भुईज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाने काही दिवसांपूर्वी गोळीबार केला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात अटक न होण्यासाठी हुंबरे यांनी तरुणाकडून ४० हजार रुपये खंडणी घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पुणे महापालिकेतील पदाधिकारी महिलेचा कोरोना रिपोर्ट समोर; रिपोर्टमध्ये...

हुंबरे यांच्याविषयी पुणे शहरात अनेक तक्रारी होत्या. आयुक्तांनी या तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्यांची बदली कार्यकारी पदावरुन विशेष शाखेत केली होती. मात्र, तेथेही ते लोकांचा घोळका जमवून दरबार भरवत असल्याचे आढळून आले होते. त्याच्याबाबत तक्रारी येऊ लागल्याने कोरोना विषाणुच्या काळात पोलिस अधिकार्‍यांची अधिक गरज असताना पोलिस आयुक्तांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. सक्तीच्या रजेवर असतानाही त्यांनी बेकायदेशीर कामे सुरूच ठेवल्याचे या प्रकरणावरुन स्पष्ट झाले आहे. सातारा पोलिस काय अहवाल पाठवणार याकडे अनेक पोलिसांचे लक्ष लागले आहे.

पुण्यातल्या शास्त्रज्ञांची आणखी एक भरारी; अवकाशातील दुर्मिळ घटना टिपली!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT