Deepak_Maratkar_Shivsena 
पुणे

मारटकर खून प्रकरण : वेश्‍यावस्तीत वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठीच खून

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बुधवार पेठेतील वेश्‍यावस्तीत दहशत आणि वर्चस्व निर्माण करत आर्थिक फायद्याच्या उद्देशाने बाप्पू नायर टोळीचा तात्पुरता टोळी प्रमुख स्वप्नील मोडवे याने सनी कोलतेमार्फत संघटित टोळी तयार केली. त्यानंतर या आरोपींनी दीपक मारटकर यांचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या प्रशांत ऊर्फ सनी प्रकाश कोलते (वय 25), राहुल श्रीनिवास रागीर (वय 22), रोहित ऊर्फ बाळा कमलाकर कांबळे (वय 22), रोहित दत्तात्रेय क्षीरसागर (वय 21), संदीप ऊर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते (वय 23) आणि लखन मनोहर ढावरे (वय 30) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना शुक्रवारी (ता.9) न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी त्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.

गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे आरोपींनी सनी कोलते राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमधील नळाखाली धुतली. त्यानंतर, सर्वजण दौंड तालुक्‍यातील पांढरेवाडी परिसरातील एका लॉजमध्ये वास्तव्यास असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. खून प्रकरणात नष्ट करण्यात आलेल्या पुराव्यांचा पंचनामा करण्यात आला आहे.

गुन्ह्यातील आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. ते बापू नायर टोळीचे सक्रिय सदस्य आहेत. फरार आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करायची आहे. मारटकर यांचा खून हा नियोजनबद्ध कट असून तो पूर्णत्वास नेण्यासाठी यामध्ये आणखी कोणी आहे का? याचा तपास करायचा असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील ऍड. सुरेखा क्षीरसागर यांनी केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Ganpati Decoration 2026: कागदी कमळ, केळीची पाने अन् कापसाचे ढग; यंदा गणपती सजावटीसाठी ट्राय करा १० भन्नाट अन् सोप्या आयडिया!

Pune Water Supply: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

SCROLL FOR NEXT