defame sakal
पुणे

पुणे : अल्पयवीन मुलीची खासगी छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी

सायबर पोलिसांकडून आरोपीला मुंबईतुन अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : इन्स्टाग्रामद्वारे (Instagram)अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिची खासगी छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकून तरुणाने तिची बदनामी (Defame)केली. याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी (Cyber police)आरोपीस मुंबईतुन बेड्या ठोकल्या.

यश बाबासाहेब भंडारे (वय 19, रा. ठक्कर बप्पा कॉलनी, चेंबुर, मुंबई) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 16 वर्षीय मुलीच्या आईने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डि.एस.हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी व तरुणाची इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने तिच्याशी संवाद वाढवून, गोड बोलून तसेच धमकी देऊन तिची खासगी छायाचित्रे स्वतःकडे मागवून घेतली. त्यानंतर त्याने तिची छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकून तिची बदनामी केली. मुलीने हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर तिच्या आईने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली.

त्यावरुन लहान मुलांचे लैंगिक शोषण अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (पॉक्‍सो) गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सायबर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या इन्स्टाग्रामची माहिती तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे मिळविली. त्यावेळी संबंधित खाते मुंबईत राहणाऱ्या यश भंडारे या तरुणाचे असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक संगिता माळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्‍विनी पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुभाष माने, पोलिस हवालदार राजेश केदारी, राहूल हंडाळ, अस्लम अत्तार, अंकीता राघो, जान्हवी भडेकर यांच्या पथकाने भंडारे यास मुंबईतुन अटक केली.

"गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून ऑनलाईन, इन्स्टाग्राम किंवा कोणत्याही समाजमाध्यमांद्वारे मुला-मुलींशी ओळख निर्माण करुन त्यांच्याशी मैत्री केली वाढवून गैरप्रकार केले जातात. त्यामुळे मुला-मुलींनी त्यांची वैयक्तीक छायाचित्रे कोणालाही पाठवू नयेत. कोणी त्रास देत असल्यास किंवा गैरप्रकार करीत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.''

- डी.एस.हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, DC vs PBSK: दिल्लीने उभारल्या IPL 2026 मधील सर्वोच्च धावा! केएल राहुलचं वादळी दीडशतक अन् नितीश राणासोबत विक्रमी पार्टनरशीप

Mumbai News: मुंबईत २७ वर्षांनंतर सूडाची थरारक कहाणी! दया नायकांकडून काकाचा एनकाउंटर; बदल्यातून पुतण्याने खबऱ्याला क्रूरपणे संपवलं

Solapur Crime News: ९० हजारांच्या बनावट लुटीचा पर्दाफाश; फिर्यादीच निघाला द्राक्ष खरेदीच्या रकमेचा चोर

Solar Power Extra Charges: स्व-उपभोग सौर विजेवर अतिरिक्त शुल्काचा प्रस्ताव; ग्राहक पंचायतीचा तीव्र विरोध, राज्यभर जनजागृती व आंदोलनाची चेतावणी

Pachod News : दुधाच्या हव्यासापोटी ऑक्सिटोसिन इंजेक्शनांचा ग्रामिण भागात सर्रास वापर

SCROLL FOR NEXT