rajnath-singh sakal
पुणे

संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी पुण्यात दिले नव्या वादंगाला आमंत्रण !

राजमाता जिजाबाई, समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिल्यामुळे शिवाजी महाराज छत्रपती म्हणून घडलें आणि राष्ट्रनायक झाले, असे म्हणत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नव्या वादंगाला शुक्रवारी आमंत्रण दिले.

- मंगेश कोळपकर

पुणे : राजमाता जिजाबाई, समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिल्यामुळे शिवाजी महाराज छत्रपती म्हणून घडलें आणि राष्ट्रनायक झाले, असे म्हणत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नव्या वादंगाला शुक्रवारी आमंत्रण दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यात फक्त राजमाता जिजाबाई यांचाच सहभाग असल्याचे राज्यातील अनेक मराठा संघटनांचे म्हणणे आहे. समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचा महाराजांना घडविण्यात काहीही सहभाग नाही, असेही संघटनांचे म्हणणे आहे. या मुद्द्याभोवती महाराष्ट्रातील राजकारण अनेक दिवस फिरत होते. त्यामुळे हा मुद्दा भावनिकही झाला आहे. (Pune News)

या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज हा मुद्दा महाराष्ट्रात संवेदनशील आहे, याची माहिती केंद्रीय मंत्र्यांना पुण्यात येताना नव्हती का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. कोणतेही केंद्रीय मंत्री देशाच्या विविध भागात प्रवास करतात. त्यावेळी स्थानिक मुद्द्यांची पूर्वमाहिती घेऊन त्या बाबत ते वक्तव्य करतात. परंतु, पुण्यात येताना राजनाथसिंह यांना शिवाजी महाराजांना कोणी घडविले, त्याबद्दलचे वाद-प्रवाद याबद्दलची माहिती कोणी दिली नाही का, या बाबतही चर्चा सूरू झाली आहे.

राजनाथसिंह भाषणाच्या ओघात खेळाचे महत्त्व स्पष्ट करताना, छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले ते बरोबर आहे. राजमाता जिजाबाईंचाही उल्लेख बरोबर आहे. परंतु, रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख समोयोचित होता का, या बद्दल प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

राजनाथसिंह म्हणाले......

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक-

खेळाला खूप महत्त्व आहे, याचे सर्वांत चांगले उदाहरण महाराष्ट्रात आहे. शिवाचा छत्रपती शिवाजी महाराज होण्यामागे खेळ हा घटक आहे. त्यांना जिजामाता, समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिले आणि ते राष्ट्रनायक झाले.

- ‘‘लष्करातील खेळाडूंनी बजावलेल्या अतुलनीय कामगिरीने युवा पिढी खेळाकडे निश्चितच आकर्षित होणार आहे,’’ अशी आशा व्यक्त करत मंत्री राजनाथसिंह म्हणाले, ‘‘स्टेडियमला नीरज चोप्रा यांचे नाव देऊन खेळांडूप्रति स्नेह, सन्मान आणि आदरभाव व्यक्त होत आहे. रामायण, महाभारत काळात युद्धविद्या हा पाठ्यक्रमाचा भाग होता. तलवारबाजी, भालाफेक शिकविले जात. नालंदा, तक्षशिला विद्यापीठात त्यावेळच्या परदेशातून खेळाडू शिकायला येत असत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Attack : मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित घटना ! धावत्या ट्रेनमध्ये तिघांनी तरुणावर केले सपासप वार

Yavatmal Crime: यवतमाळ हादरले! रागाच्या भरात वडिलांनी केला मुलीचा खून; मृतदेह गोठ्यात लटकवून फाशीचा केला बनाव

Latest Marathi News Live Update : नागपुरात नगरसेवक वसीम खान यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे कारण?

Kashedi Ghat Landslide : महामार्गावरील एक मार्गिका तब्बल 14 तास बंद; धामणदेवी-चोळई येथे दरड कोसळली, रस्ता खुला करण्याच्या कामात पावसाचे विघ्न

Pune News: मोठी घडामोड! यशवंत कारखान्याच्या 99 एकर जमीन व्यवहाराला सरकारची पुन्हा स्थगिती, खरेदीखत पूर्ण, तरीही ब्रेक

SCROLL FOR NEXT