corona test.jpg 
पुणे

...म्हणून भिगवण कोविड सेंटरमध्ये अॅंटीजेन टेस्ट करण्याची केली जातीये मागणी 

प्रशांत चवरे

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन कोरोना रॅपिड अॅंटीजेन टेस्ट सेंटर भिगवण येथील कोविड केअर सेंटरमध्ये सुरु करावे, अशी मागणी मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते यांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले आहे. 


इंदापूर तालुक्यामध्ये सध्या केवळ इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना रॅपिड अॅंटीजेन टेस्टची सुविधा आहे. तालुक्यातील रुग्णांना तपासणीसाठी इंदापूर येथे जावे लागते. येथील केंद्रावर चाचण्यांचा मोठा ताण आहे. संपूर्ण तालुक्यातून नागरिक येथे येत असतात. त्यामुळे या केंद्रावर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चाचणीसाठी रुग्णासोबत गेलेल्या नागरिकांनाही धोका निर्माण होत आहे. भिगवण येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी रॅपिड टेस्ट सोय केल्यास तपासणीचा वेग वाढेल व पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार शक्य होईल. त्यामुळे संसर्गाचा धोकाही कमी होईल. त्यासाठी भिगवण येथे कोरोना रॅपिड अॅंटीजेन टेस्ट सेंटर सुरु करावे, अशी मागणी देवकाते यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपर दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, महापौर रितू तावडेंनी झटकले हात; म्हणे, लोक ऐकत नाहीत

Chakan Traffic Crisis : चाकण सोडणार, महाराष्ट्र नाही; त्रस्त उद्योगपतींनी मांडल्या व्यथा, म्हणाले- गुजरातमध्ये जाणार होतो पण...

IND vs SL Test: बुमराह, सुदर्शननंतर भारताला आणखी एक धक्का; मालिका सुरू होण्यापूर्वी एका खेळाडूबाबत नकोशी बातमी समोर...

Marathi News Live Updates : संसदेचं कामकाज चालू द्या, मी सगळ्यांचं ऐकेन आणि उत्तर देईन : अमित शहा

Maharashtra Tender Rules: कंत्राटदारांना राज्य सरकारचा चाप, कामगिरी प्रमाणपत्र बंधनकारक; तीन श्रेणींत वर्गीकरण

SCROLL FOR NEXT