bhimashankar.jpg 
पुणे

आंबेगावात पर्यटकांना गावबंदी करण्याची होतीये मागणी कारण...

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमाशंकर, कोंढवळ, आहुपे व डिंभे धरणाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. या भागामध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पर्यटकांना गावबंदी करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांचेकडे केली असल्याचे पंचायत समिती सभापती संजय गवारी व माजी उपसभापती नंदकुमार सोनावले यांनी सांगितले. 

आंबेगाव तालुक्यात स्थानिक कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना पश्चिम भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात जाणवत आहे. परंतु, या भागात नागरिक पर्यटनास येत आहेत. तसेच, आदिवासी भागातील नागरिक सातगाव पठार भागामध्ये बटाटा काढणीला मोठ्या प्रमाणात येत आहेत. मात्र, या भागामध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे आदिवासी भागात कोरोना पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातच काम उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामपंचायतीमार्फत अर्ज गोळा करण्याचे काम करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करावा, यासाठी सोनावले यांनी संबंधित ग्रामपंचायतींना सुचना दिल्या आहेत. तर, रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेल्या कामांसाठी जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन गवारी यांनी केले आहे. 
तसेच, या भागामध्ये कारोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून बाहेर गेलेल्या व्यक्तींची तपासणी करून गावात पाठवावे, म्हतारबावाडी येथील महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे भक्त निवास कोरोना सेंटर; तर तळेघर येथील ग्रामीण रूग्णालय येथे रूग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्याबाबत कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील साबळेवाडी, शिंदेवाडी, खुपिरे परिसरात २४ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबलची चोरी

कतरिनाच्या गाण्यावर गौतमीचा भन्नाट डान्स, एन्ट्री स्टेप पाहून नेटकरी थक्क, Viral Video

SCROLL FOR NEXT