bill.jpg 
पुणे

मुख्यमंत्र्यांकडे चार महिन्यांचे वीजबिल माफ करण्याची....

सकाळवृत्तसेवा
औंध (पुणे) : कोरोनामुळे राज्यातील रोजगाराची सर्वच साधने बंद पडलेली आहेत. यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अडचणीत आलेल्या राज्यातील ज्या नागरिकांचा विजेचा वापर दर महिना दोनशे युनीटपेक्षा कमी आहे, अशा सर्वांचे चार महिन्याचे विज बिल माफ करावे अशी मागणी रयत विद्यार्थी परिषदेचे सचिव रविराज काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात कोविड-१९ महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटात सर्वच नागरिक अडचणीत आले आहेत. मागील अडीच महिन्यापासून राज्यातील उद्योग, व्यापार व बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. यामुळे व्यापारी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, हातावर पोट असणारे सर्व नागरिक आर्थिकदृष्ट्या संकटात आले आहेत. 
यामधील कामगार आणि शेतमजूरांना रेशनच्या माध्यमातून काही प्रमाणात सरकारकडून धान्याची मदत झाली आहे. परंतु गहू, तांदूळ, डाळ मिळाली म्हणजे घर चालते असे नाही. या सोबत किराणा, भाजीपाला, दूध, दवाखाना, शाळा किंवा इतर खर्च अनिवार्य आहे. आणि राज्यातील छोटे - मोठे  उद्योग व्यवसाय बंद पडल्यामुळे व रोजगाराची साधने नसल्याने राज्यातील नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत विद्युत बिल, पाण्याचे बिल किंवा इतर बिल नागरिकांना भरणे शक्य नाही. आणखी काही महिने या आर्थिक अडचणीतून सामान्य नागरिकांना सावरणे कठीण आहे. यासाठी थोडीशी मदत म्हणून राज्यातील ज्या नागरिकांच्या विजेचा वापर मासिक दोनशे युनीट पेक्षा कमी आहे, अशा सर्व नागरिकांचे विज बिल माफ करावे अशी मागणी रयत विद्यार्थी परिषदेसह राज्यातील सर्व जनतेची आहे असे निवेदनात म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकार नागरीकांना दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज पुरवत आहे. याच धर्तीवर आपल्या राज्यातील नागरिकांचे चार महिन्याचे विज बिल तातडीने माफ करण्याची घोषणा करावी अशी माणगी मुख्यमत्र्यांकडे केली आहे. अन्यथा राज्यातील जनतेला घेऊन नाईलाजास्तव आंदोलन करावे लागेल असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी सूर्यकांत सरवदे, ऋषिकेश कानवटे,ओमकार भोईर उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT