market yard.jpg 
पुणे

मार्केट यार्डातील व्यवहाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली 'ही' महत्त्वाची मागणी

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : जिल्हा प्रशासनाकडून रविवार (ता. १९) पासून लॉकडाऊन काही अंशी शिथील करण्यात येणार आहे. यामध्ये व्यवहार सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र, प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत मार्केट यार्डातील भुसार, भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, फुले आदी विभाग सुरू ठेवणे अशक्य होणार आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील व्यवहारासाठी वेळ मर्यादा वाढवून मिळावी. तसेच बाजार सुरू ठेवण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, अश्या मागणीचे पत्र बाजार समितीने जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना शुक्रवारी दिले आहे.

फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, फुले विभागात रात्रीपासून पहाटेपर्यंत शेत मालाच्या गाड्या येतात. त्यानंतर खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू होतात. गुळ-भुसार विभागाची परिस्थिती अशीच आहे. त्यामुळे प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत व्यवहार करणे अशक्य आहे. त्यामुळे गुळ-भुसार, कांदा-बटाटा, फळे, फुले आणि भाजीपाला विभागातील व्यवहारासाठी मागील लॉकडाऊनमध्ये जो कालावधी ठरला होता. तोच कालावधी या वेळीही असावा. असे बाजार समितीने पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

लॉकडाऊनमुळे मंगळवारपासून संपूर्ण शहर कडकडीत बंद आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या चारही टप्यात गुळ-भुसार विभाग सुरू होता. तर फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी आणि फुल विभाग काही दिवसांचा अपवाद वगळता बंदच होते. मात्र, या लॉकडाऊनमध्ये मार्केटयार्डातील सर्वच विभागातील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनुसार मार्केट यार्डातील विभाग सुरू होऊ शकतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळच्या मर्यादेत बाजार सुरू करणे सर्व घटकांसाठी अशक्य आहे. त्यामुळे मागील लॉकडाऊनमध्ये जी वेळ ठरली होती. त्याच वेळेत बाजार सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी. बाजार कशा पद्धतीने सुरू ठेवता येईल याबाबत मार्गदर्शन मिळावे. असे पत्र जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. त्यांच्या सुचना आणि मार्गदर्शनानुसारच बाजार सुरू होईल. त्यांच्या सूचना येईपर्यंत मुख्य बाजार आवार आणि उपबाजार बंद राहणार आहेत.
 - बी. जे. देशमुख, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT