गोडुंब्रे (ता. मावळ) - गीर गाईंना गोठ्याकडे घेऊन जाताना गोपालक. 
पुणे

लॉकडाउनच्या काळात गीर गाईच्या दुधाला दुप्पट मागणी वाढली

सकाळवृत्तसेवा

सोमाटणे - ‘दुधात रोगप्रतिकारक्षमता जास्त असल्याने लॉकडाउनच्या काळात गीर गाईच्या दुधाला दुप्पट मागणी वाढली,’’ असे मत परराज्यातील गोपालक गणपत गवळी यांनी व्यक्त केले. 

गवळी हे आपल्या साथीदारांसह चाऱ्याच्या शोधात सात वर्षांपूर्वी राजस्थानावरून पवन मावळात आले आहेत. कासारसाई, दारुंब्रे परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने गाईसाठी मुबलक चारा मिळतो. गेल्या सात वर्षांपासून सर्व गोपालक संत तुकाराम सहकारी साखर कारखाना परिसरात आपल्या कुटुंबासह तात्पुरते स्थायिक झाले. दूध व शेणखतापासून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. 

कोरोनामुळे मार्चमध्ये लॉकडाउन झाले, तेव्हा दुधाची मागणी घटण्याची भीती गोपालकांमध्ये निर्माण झाली होती. परंतु, परिस्थिती उलट झाली. गीर गाईच्या दुधात असलेल्या घटकद्रव्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. शरीर मजबूत बनते. या कारणांमुळे लॉकडाउमध्ये दुधाला दुप्पट मागणी वाढली. दुधाचे दरही प्रतिलिटर चाळीस ते साठ रुपये लिटरपर्यंत झाल्याने उत्पन्न वाढले, असे गवळी यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT