मार्केटयार्ड - पुणेकरांनी आखाडातील शेवटच्या रविवार साजरा केला. दिवसभरात तब्बल 4 टन मासळी, 800 टन चिकन, दोन हजार बोकडांचे मटन फस्त झाले. शहरातील नागरिकांनी सकाळपासून दुकांनासमोर मोठ्या रांगा लावल्या होत्या. लॉकडाउनमुळे मागणीच्या तुलनेत मटणासाठी बोकड, मासळी, चिकनची कमी आवक झाली. त्यामुळे मटण, मासळी, चिकनच्या मागणीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली. तसेच भावातही गेल्या आठवड्याच्या तुलनेत 10 ते 20 टक्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील हॉटेल बंद असल्याने पुणेकरांनी घरीच आखाड साजरा केला. सकाळच्या टप्प्यात सर्वत्र दुकानासमोर खरेदीसाठी लांबच लांब रांगा होत्या. परंतु दुपार नंतर या रांगा कमी होत गेल्या. दरवर्षी घरगुती ग्राहकांबरोबर हॉटेल आणि केटरींग व्यावसायिकाकडून चिकनला मोठी मागणी असते. मात्र, हॉटेल, खानावळ बंद राहिले. रविवारी पुणे शहर पिंपरी चिंचवड मध्ये 750 ते 800 टन चिकनची विक्री झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिकनच्या भावात 10 रूपयांनी वाढ झाली असल्याचे व्यापारी रुपेश परदेशी यांनी सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लॉकडाउनमुळे वाहतूकीला परवानगी मिळाली नाही. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत बोकडांची निम्मीच आवक झाली. मात्र मागणी चांगली होती. साधारणतः दोन हजार हजार बोकडांची विक्री झाली असल्याचे मटण विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.
घाउक बाजारातील प्रतिकिलो भाव
मासळी : पापलेट : 1100 ते 1600, सुरमई : 1300, कोळंबी : 500 ते 520, बांगडा : 360, ओले बोंबील : 280.
मटण: बोकडाचे : 700, बोल्हाईचे : 700, खिमा : 700, कलेजी : 750,
चिकन : चिकन : 180 ते 200, लेगपीस : 200 ते220, जिवंतकोंबडी : 140 ते 160, बोनलेस : 260 ते 280
मद्यप्रेमींचा मात्र हिरमोड
आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी, गटारी अमावस्या दिवशी मांसाहार तर केलाच जातो. पण, त्याचबरोबर बहुतांश मद्यप्राशनही केले जाते. मात्र, लॉकडाउनमुळे दुकाने बंद आहेत. त्यामुळे मद्यप्राशन करता न आल्याने मद्यप्रेमींचा हिरमोड झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.