road.jpg 
पुणे

चांडोली बुद्रूकमधील `तो` रस्ता...

सकाळवृत्तसेवा

महाळुंगे पडवळ (पुणे) : चांडोली बुद्रूक (ता.आंबेगाव) येथील टेमगिरेवस्ती ते पाझरघाट रस्ता गेल्या दहा ते बारा दिवसापासून काही जणांनी खोडसाळपणे रस्ता अडविला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

टेमगिरेवस्तीकडे जाणारा पाणंद रस्ता हा ओढ्याजवळून जात आहे. येथे 150 लोकवस्ती असून इतर 20 ते 22 कुटुंबांची शेतीची वहिवाट आहे. गेल्या चार वर्षापासून रस्त्याचा प्रश्‍न तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. तेव्हापासून काही जण वारंवार खोडसाळपणे रस्ता बंद करून नागरिकांना त्रास देत आहे. तसेच रस्त्यावर शौचालयाचे पाणी व अन्य सांडपाणी सोडत आहे. त्यामुळे रस्त्यावर घसरुन मोटार सायकलस्वरांचे अपघात झाले आहेत. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

""रस्ता अडविल्याने शेतीमाल वाहतूक करता येत नाही. या प्रश्‍नाच्या पाठपुराव्यासाठी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना ग्रामस्थांचे शिष्टमंडळ भेटणार आहे. उपविभागीय अधिकारी मंचर-जुन्नर व तहसीलदार यांनी रस्त्याची स्थळ पाहणी करून ग्रामस्थांना योग्य तो न्याय द्यावा. अन्यथा दोन्ही कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल,'' असा इशारा रामदास टेमगिरे, अरुण टेमगिरे व प्रकाश टेमगिरे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT