The demand that petroleum companies help petrol pump operators 
पुणे

पेट्रोलपंप चालक अडचणीत! मुख्यमंत्र्याकडे केली 'ही' मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर खुप कमी झालेले असले तरी पेट्रोलचे दर कमी झालेले नाहीत. शिवाय लाॅकडाऊनमुळे पेट्रोल विक्री अत्यल्प असल्याने कामगारांचा पगार ही निघत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांना मदत करावी अशी मागणी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनसने केली आहे.
 
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
पेट्रोल-डिझेल अत्यावश्यक सेवा असल्याने लाॅकडाऊन मध्ये त्यांची विक्री सुरू आहे. रस्त्यावरील गर्दी कमी असल्याने केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच पेट्रोल विक्री करावी असे आदेश काढले आहेत. त्यामुळे सध्या ९० टक्के विक्री घटली असून केवळ १० टक्केच विक्री होत आहे. मात्र पेट्रोलपंप चालकांचा खर्च कमी झालेला नाही. कर्मचाऱ्यांचा पगार, वीज बील याचा खर्च ही इंधन विक्रीतून निघत नाही. तसेच कंपन्यांनी पेट्रोलपंप चालकांना मास्क, हॅडग्लोज याची व्यवस्था करणे गरजेचे होते, हा खर्च ही पंप चालकांना करावा लागत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर खुप कमी झाले आहेत, याचा फायदा कंपन्या घेत असल्या तरी त्याचा दिलासा पंप चालक किंवा ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील ६ हजार पेट्रोलपंप चालक सध्या तोट्यात पंप चालवत आहेत. यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मदत करावी यासाठी कंपन्यांना पत्र पाठवले आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असे, फेडरेशनचे सागर रुकारी यांनी सांगितले. 

ब्रिटिश काळातही पुण्यातल्या पेठा रिकाम्या केल्या होत्या; वाचा इंटरेस्टिंग इतिहास 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT