crime of demanding ransom sakal
पुणे

संजीव बजाज यांच्यासह तिघांना ईमेलद्वारे साडे अकरा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी

डाटा हॅक करण्याची धमकी देऊन आभासी चलनाद्वारे खंडणी कळण्याचा प्रयत्न, विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनोळखी व्यक्तींनी कंपनीचा डाटा हॅक (Data Hack)करण्याची धमकी देऊन थेट बजाज फायनान्स कंपनीचे (Bajaj Finance Limited)संजीव बजाज (Sanjiv Bajaj)यांच्यासह तिघांना ईमेलद्वारे (E-mail)11 कोटी 63 लाख रुपयांची खंडणी (Ransom)मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खंडणी न दिल्यास कंपनीचे मोठे नुकसान करु, अशीही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. याप्रकरणी विमांतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी बजाज फायनान्सचे (Bajaj Finance)अधिकारी युवराज मोरे (वय 32, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन ईमेल पाठविणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीव बजाज,(Sanjiv Bajaj) वरिष्ठ अधिकारी दीपक रेड्डी, दीपक बगाडी, संजीव यांना 28 नोव्हेंबरला natasa.petrova@protomail.com या ईमेलवरून एक संदेश पाठविण्यात आला होता. त्यामध्ये आम्हाला 11 कोटी 63 लाख रुपयांची खंडणी द्यावी, अन्यथा कंपनीचा डाटा हॅक करुन कंपनीचे मोठे नुकसान करु, खंडणीची रक्कम डोजे कॉइन या चलनाद्वारे पाठवावी, असा मजकूर देण्यात आला होता. भारतीय चलनात आभासी चलनाचे मूल्य 11 कोटी 63 लाख रुपये इतके होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी प्रारंभी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर सायबर पोलिसांनी याप्रकरणाचा अर्ज विमानतळ पोलिसांकडे पाठविला. त्यावरुन अनोळखी व्यक्ती विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप करीत आहेत.(pune cyber crime news)

"डोजे क्वाईन' म्हणजे काय ?

डोजे क्वाईन हे बिटकॉईन प्रमाणे आभासी चलन प्रकारातील चलन आहे. डोजे क्वाईन हे आभासी चलन परदेशातील बिली मार्कस, जॅक्‍सन पालमर यासह काही संगणक अभियंत्यांनी एकत्र येऊन आर्थिक व्यवहार करण्यासाठी वेगळी व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी त्यांनी "मीमी क्वाईन' तयार केले. त्यानंतर "डॉग क्वाईन' अस्तित्वात आणले. 2013 पासून ते "डोगे क्वाईन' म्हणून ओळखले जाऊ लागले असून त्यामध्ये परदेशात त्यामध्ये गुंतवणक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अन्य सायबर गुन्हेगारांप्रमाणेच या गुन्ह्यातही गुन्हेगारांनी खंडणीची रक्कम बिटकॉईन स्वरुपातील "डोजे क्वाईन' या आभासी चलनाद्वारे मागण्यात आली आहे.(pune news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT