वडगाव मावळ - वडगाव-तळेगाव फाट्यावर वाहनांच्या वर्दळीमुळे होत असलेली कोंडी. 
पुणे

वडगाव-तळेगाव फाट्यावरील चौकातील कोंडी सोडविण्याची मागणी

ज्ञानेश्वर वाघमारे

वडगाव मावळ - पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव-तळेगाव फाट्यावरील चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी व वाढलेला अपघातांचा धोका लक्षात घेऊन सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची गरज आहे. रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी ब्लॅक स्पॉटची पाहणी केली होती. परंतु उपाययोजनांची अद्याप अंमलबजावणी झाली नाही.

गेल्या काही वर्षांत पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांची रहदारी वाढली आहे. दररोज हजारो वाहने या मार्गावर धावतात. तळेगाव दाभाडे, चाकण, रांजणगाव व पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या कंपन्यांमुळे कंटेनर व अवजड वाहतूक करणारी वाहने, कामगार बस व प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महामार्गालगतच्या गावांसाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सेवारस्ते नसल्याने अपघातांची संख्याही वाढली आहे. 

अंमलबजावणी नाही
दोन वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यासह इतर अधिकाऱ्यांनी महामार्गावरील ब्लॅक स्पॉटची पाहणी केली होती. वडगाव येथे अंडरपास, वडगाव-तळेगाव फाट्यावर उड्डाण पूल, तळेगावच्या दिशेने वडगावमध्ये प्रवेश करणारा रस्ता अंडरपास करणे, तळेगाव दाभाडे येथील लिंबफाटा (विप्रज फाटा) येथे उड्डाण पूल बांधणे अथवा अंडरपास करणे, सोमाटणे फाटा येथे उड्डाण पूल बांधणे आदी उपाययोजनांची मागणी या वेळी करण्यात आली होती. परंतु कामशेत येथील उड्डाण पूल व वडगाव येथील सेवा रस्ता वगळता इतर ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली नाही. कामशेत व वडगाव येथील कामेही अद्याप अपूर्ण आहेत. 

कायम वर्दळ
तळेगाव-चाकण राज्य मार्ग तसेच द्रुतगती मार्गाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची वडगाव फाट्यावर कायम वर्दळ असते. तळेगाव एमआयडीसी, चाकण येथील औद्योगिक क्षेत्राकडे जाणारी मालवाहतुकीची अवजड वाहने, द्रुतगती मार्गाकडे जाणारी वाहने यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चौकात कोंडी होते. बेशिस्त वाहनचालकांमुळे त्यात भर पडते. अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाने तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची गरज आहे. 

ब्लॅक स्पॉटची ठिकाणे
देहूरोड येथील इंद्रायणी नगर, सोमाटणे फाटा, तळेगाव येथील लिंब फाटा, वडगाव-तळेगाव फाटा, एमआयडीसी फाटा, माळीनगर, कान्हे फाटा, कामशेत-पवनानगर चौक, कार्ला फाटा.

स्वयंशिस्त महत्त्वाची
तळेगाव-चाकण मार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी असल्याने ती सायंकाळी सातपर्यंत वडगाव-तळेगाव चौक परिसरात उभी असतात. त्यामुळे संध्याकाळी कोंडी होते. बेशिस्त वाहनचालकांमुळेही त्यात भर पडते. कारवाई होते, मात्र स्वयंशिस्त गरजेची आहे, असे मत वडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सांगितले.

पुणे-मुंबई महामार्गावरील वर्दळीच्या व ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी उड्डाण पूल, अंडरपास आदी सुरक्षाविषयक उपाययोजनांचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय राजमार्ग विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत. मंजुरी मिळताच कामे सुरू होतील.
- आर. आर. सोनवणे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT