bhigwan.jpg 
पुणे

...म्हणून भिगवणमधील कोविड केअर सेंटर स्थलांतरित करण्याची होतीये मागणी 

प्रशांत चवरे

भिगवण (पुणे) : येथील स्वामी विवेकानंदनगर येथे उभारण्यात आलेल्या खासगी कोविड केअर सेंटरमुळे या भागातील रहिवाशांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाल्याची तक्रार करत लोकवस्तीमधील कोविड केअर सेंटर तातडीने स्थलांतरित करावे, अशी मागणी येथील स्वामी विवेकानंदनगर, शरदनगर व मंगलदृष्टी सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे. याबाबत रहिवाशांनी जिल्हाधिकारी, प्रातांधिकारी, तहसीलदार व आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवदेन दिले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 
ज्या ठिकाणी हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे ते दाट लोकवस्ती व वर्दळीचे ठिकाण आहे. तेथे रुग्णवाहिका, वाहने पार्किंगसाठी व नातेवाइकांना थांबण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत. तसेच कोरोना रुग्णांचे नातेवाईक या भागांमध्ये फिरत असल्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे, अशी तक्रार या भागातील रहिवाशांनी केली आहे. आंदोलन करण्याचा इशाराही या भागातील रहिवाशांनी दिला आहे. खासगी कोविड केअर सेंटरच्या संचालकांनी सांगितले की, रहिवाशांना कोणतीही अडचण होणार नाही अशी व्यवस्था करून त्यांचा गैरसमज दूर करू. 

खासगी कोविड सेंटरबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत आरोग्य विभागास चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. 
- सोनाली मेटकरी, तहसीलदार, इंदापूर 

 


ट्रॉमा केअरमधील जागा द्यावी... 
येथील ट्रॉमा केअरमध्ये सध्या सरकारी कोविड केअर सेंटर सुरू आहे. ट्रॉमा केअरमध्ये आणखी काही इमारती उपलब्ध आहेत. प्रशासनाने खासगी हॉस्पिटलला ट्रॉमा केअर सेंटरमधील सरकारी इमारत कोविड केअर सेंटरसाठी काही काळ वापरण्यास दिली तर रहिवाशांचाही प्रश्न सुटेल आणि कोविड रुग्णांना उपचारही मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपर दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, महापौर रितू तावडेंनी झटकले हात; म्हणे, लोक ऐकत नाहीत

Chakan Traffic Crisis : चाकण सोडणार, महाराष्ट्र नाही; त्रस्त उद्योगपतींनी मांडल्या व्यथा, म्हणाले- गुजरातमध्ये जाणार होतो पण...

IND vs SL Test: बुमराह, सुदर्शननंतर भारताला आणखी एक धक्का; मालिका सुरू होण्यापूर्वी एका खेळाडूबाबत नकोशी बातमी समोर...

Marathi News Live Updates : संसदेचं कामकाज चालू द्या, मी सगळ्यांचं ऐकेन आणि उत्तर देईन : अमित शहा

Maharashtra Tender Rules: कंत्राटदारांना राज्य सरकारचा चाप, कामगिरी प्रमाणपत्र बंधनकारक; तीन श्रेणींत वर्गीकरण

SCROLL FOR NEXT