police bharti.jpg 
पुणे

पोलिस भरतीबाबतचा 'हा' संभ्रम दूर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सकाळवृत्तसेवा

गोखलेनगर (पुणे) : राज्य सरकारने पोलिस भरती जाहीर केली. पोलिस भरती करत असलेल्या उमेदवारांमध्ये एकीकडे आनंदाचे वातवरण असताना दुसरीकडे संभ्रम आहे. एकीकडे कोरोनामुळे राज्य सरकार महाविद्यालयीन परिक्षा घेण्यास विरोध करत आहे, आणि दुसरीकडे भरती घेतली जाणार असे जाहीर केले आहे. पोलिस भरती घेत असताना होणारी गर्दी सर्वश्रुत आहे.

तिथून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. तसेच पोलिस भरतीत देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बरेच बदल झाले होते. त्यानुसार भरती होणार की स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी ज्या प्रमाणे भरती घेतली होती. त्या पद्धतीने होणार? हे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर करावे अशी मागणी पोलिस भरती विद्यार्थी संघर्ष समितीने  ई-मेल द्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

"पोलिस भरती घेण्याची घोषणा करून  महाविकास आघाडी त्यांचा शब्द पाळत आहे. पोलिस भरतीत प्रथम लेखी परीक्षा होणार की मैदानी चाचणी होणार हे गृहमंत्री अनिल देशमुखांनी जाहीर करावे"
- सुरज पवार, समन्वयक, पोलिस भरती विद्यार्थी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य

"पोलिस भरती ही आर. आर. आबांनी ज्या पद्धतीने घेतली होती त्याच प्रमाणे घेण्यात यावी अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत"
-  रोशन जाधव, समन्वयक, पोलिस भरती विद्यार्थी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT