shivsena 
पुणे

पुण्यातील शिवसैनिकांना हवाय यांच्या रूपाने हक्काचा आमदार...

सुदाम बिडकर

पारगाव (पुणे) : माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनाव्दारे केली असल्याची माहीती शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे, मात्र, मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या मतदारांची व शिवसैनिकांची कामे होत नाहीत. त्यांची कुचंबना होत आहे. जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविणारा व शिवसैनिकांना बळ देणारा खंबीर प्रशासक व लोकप्रतिनीधी असणे गरजेचे आहे. त्याकरिता माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनाव्दारे केली असल्याची माहीती शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.

लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना कटके यांनी ही माहिती दिली. या वेळी माजी आमदार शरद सोनवणे, सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, सुलभा उबाळे, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, राजाराम बाणखेले, सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले, माउली खंडागळे, अरुण गिरे, सचिन बांगर, पोपट शेलार, रामदास धनवटे, शिवाजी वर्पे, अनिल डोके, अजित चव्हाण आदी उपस्थीत होते.

कटके निवेदनाद्वारे म्हणाले की, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असलेले सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून शिवसैनिक आनंदी आहेत. परंतु, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेसची एकहाती सत्ता आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे शिवसैनिकांची कामे होत नाहीत. राष्ट्रवादी व कॉग्रेस बरोबर राज्यात आघाडी असली, तरी जिल्हा व तालुका पातळीवर आघाडी धर्म पाळला जात नाही. शिवसेनेचा आवाज जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात एखादा दुसरा अपवाद वगळता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जवळ आल्या आहेत. 

त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढविणारा व शिवसैनिकांना बळ देणारा खंबीर लोकप्रतिनिधी म्हणून आढळराव पाटील यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी द्यावी. त्यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात तीव्र संघर्ष करत 15 वर्ष खासदार म्हणून प्रभावीपणे काम केले आहे. ग्रामिण भागात पक्ष संघटनाही वाढवली आहे. त्यांचे उद्योग, शिक्षण व सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. ते राज्यपाल नियुक्तीच्या सर्व निकषात बसत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करुन आढळराव पाटील यांना निश्चित संधी देतील, असा विश्वास कटके यांनी व्यक्त केला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉन्चपूर्वीच सिक्रेट जगजाहीर! समोर आली Samsung Galaxy A57 अन् A37 स्मार्टफोनची किंमत; पाहा सगळे वेरिएंट एका क्लिकवर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

SCROLL FOR NEXT