quarantine stamp 
पुणे

क्वारंटाइनच्या शिक्‍क्‍यासाठी महत्त्वाची मागणी 

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यासाठी वापरलेली शाई लगेच पुसली जात आहे. त्यामुळे हा शिक्का मारण्यासाठी न पुसणारी शाई वापरावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

होम क्वारंटाइनसाठी मारलेला शिक्का लगेचच पुसला जात आहे. त्यामुळे कोरोनाबाधित क्षेत्रातून आलेले नागरिक सर्वत्र मुक्त संचार करताना दिसत आहेत. त्यातून जुन्नरच्या आदिवासी भागात व तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वाढली आहे. यासाठी शिक्‍क्‍याची शाई सहज पुसणारी नसावी, अशी विनंती प्रशासनास करण्यात आली असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ देवाडे यांनी सांगितले. 

जुन्नर तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील विविध गावातून पुणे, मुंबई व अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. दररोज गावोगावी होणाऱ्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट होत आहे. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात येत असून, त्यांच्या हातावर ग्रामपंचायतीमार्फत तसा शिक्का मारण्यात येत आहे. परंतु, या शिक्‍क्‍यासाठी वापरली जाणारी शाई ही लगेचच पुसली जात आहे. त्याचे प्रात्यक्षिक देवाडे यांनी करून दाखविले आहे. 

जुन्नर तालुक्‍यातील 12 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कक्षेत 39 हजार 508 नागरिक आल्याची नोंद असून, यापैकी 39 हजार 508 जणांचे होम क्वारंटाइन पूर्ण झाले असून, अद्याप 949 जणांचे होम क्वारंटाइन पूर्ण व्हायचे आहे. तसेच, दररोज येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिक्‍क्‍याची शाई न पुसणारी असणे गरजेचे झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT