daund
daund 
पुणे

अरे वा, आंदोलन करावे तर असे...

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरातून जाणाऱ्या नगर- दौंड- कुरकुंभ- बारामती- फलटण राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी वाहनचालक व पादचाऱ्यांना कोणताही त्रास न देता हातात फलक घेऊन एक तास नागरिक उभे राहिले.

दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचच्या पुणे गेटसमोर आज (ता. 14) नागरिकांनी हातात फलक घेत रुंदीकरणाची मागणी केली. सध्या या महामार्गावरील रेल्वे उड्डाण पूल ते गोकूळ हॉटेलमार्गे रोटरी सर्कल रस्त्याचे काम सुरू आहे. अतिक्रमणे व रस्त्यावरील महावितरणच्या वीजपेट्या न काढता त्याभोवती कॉंक्रिटीकरण केले जात आहे. नागरी वस्तीमधून जाणाऱ्या या अरुंद महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी करणारे फलक घेऊन नागरिक एक तास उभे होते. 

वासुदेव काळे, ऍड. सिकंदर शेख, राजेंद्र खटी, उल्का कांबळे, सोहेल खान, सुनील शर्मा, सुनील औटे, छगन सूळ, संदीप त्रिभुवन, राजेश गायकवाड, सचिन गायकवाड, संदीपान वाघमोडे आदी या वेळी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT