crime2.jpg 
पुणे

रहिवाशांची अडवणूक करणाऱ्या औंधमधील सोसायटीच्या सचिवावरील गुन्हा...

सकाळवृत्तसेवा

औंध (पुणे) : येथील रोहन नीलय सोसायटीत येणाऱ्या कुटुंबास आरोग्य प्रमाणपत्राची मागणी करुन अडवल्या प्रकरणी सचिव सुनिल शिवतारे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी पुणे गृहनिर्माण महासंघाच्या वतीने पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, सहकार आयुक्त व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच काम करत असतांना समन्वय राहण्यासाठी सहकार उपनिबंधकांच्या स्तरावर गृहनिर्माण संस्था, गृहनिर्माण महासंघ व महानगरपालिका यांची संयुक्त समिती स्थापन करावी अशीही मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

औंध मधील रोहन नीलय सोसायटीच्या सचिवावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राज्यातील गृहनिर्माण महासंघाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याची सर्वांनी मागणी केली होती. यानंतर पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी या मागणीचे निवेदन सहकार आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांना दिले आहे. तसेच त्या त्या परिसरातील सोसायट्यांच्या प्रतिनिधींना घेऊन समिती गठीत करावी व त्यात त्या विभागातील पोलिस अधिकारी, क्षेत्रिय कार्यालयाचे अधिकारी, गृहनिर्माण महासंघाचे प्रतिनिधी यांचा समावेश करुन उपाययोजना करण्यासाठी आठवड्यात एक बैठक घेतली जावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचे संक्रमण रोखताना सोसायट्यांकडून विविध प्रयत्न केले गेले आहेत.सरकारी खात्याकडून परिपत्रके, आदेश जारी केले जात असतांना ते सोसायट्यांच्या पदाधिका-यांपर्यंत पोहचवले जावे जेणेकरून अंमलबजावणीत समन्वय राहील व संबंधित सचिवाविरुद्ध चुकीच्या पद्धतीने दाखल झालेला गुन्हा मागे घेण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT