court sakal
पुणे

लग्नास मागणी घालणे; लैंगिक छळ नाही

आरोपीने २०१९ मध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या वाढदिवशी त्याच्या कारमध्ये घेऊन जाऊन प्रेम व्यक्त केले होते. तसेच लग्नाची मागणी घातली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अल्पवयीन मुलीकडे लैंगिक हेतूशिवाय प्रेम व्यक्त करणे तसेच लग्नाची मागणी घालणे म्हणजे लैंगिक छळ म्हणता येणार नाही, असा निष्कर्ष काढणारा महत्त्वपूर्ण निकाल येथील विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी दिला आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीची न्यायालयाने बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे

आरोपीने २०१९ मध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या वाढदिवशी त्याच्या कारमध्ये घेऊन जाऊन प्रेम व्यक्त केले होते. तसेच लग्नाची मागणी घातली होती. त्यापूर्वीही त्याने प्रेम व्यक्त करीत लग्नाची मागणी केली होती. त्यामुळे याबाबत मुलीच्या आर्इने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ३६३ (पळवून नेणे) आणि ३५४ (ड) विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) कलम ११ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला होता. आरोपीने केलेले कृत्य कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचाराच्या श्रेणीत ही घटना येत नाही, असा युक्तिवाद ॲड. श्रीधर एस. हुद्दार यांनी केला. यावेळी त्यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याचे दाखले दिले.

मुलीने गाडीत बसण्यास विरोध केला नाही

आरोपीने मुलीचे अपहरण केले, असे फिर्यादीत नमूद होते. मात्र मुलीने आरोपीच्या गाडीत बसण्यास विरोध केला नसल्याचे पुराव्यांवरून सिद्ध होते. तसेच, या प्रकरणात महत्त्वाचे साक्षीदार तपासलेले नाहीत. यावरून आरोपीने अपहरण व विनयभंग केल्याचे सिद्ध होत नाही. आरोपीने त्याचे प्रेम व्यक्त करणे, लग्नासाठी विचारणे हे लैंगिक हेतूशिवाय असेल तर लैंगिक अत्याचार होत नाही, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा उलटफेर! खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली; आज किती आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव?

आमदार निधी कुठे वापरला? हिशोब मतदारांपुढे ठेवणारा लोकप्रतिनिधी; कोण होते प्रा. बी.टी. देशमुख?

Uddhav Thackeray: आदित्य ठाकरेंवर टीका करणाऱ्या खासदारांसह ट्रोलर्सना उद्धव ठाकरेंनी खडसावलं

Latest Marathi Live Updates: श्रीरामपूरमध्ये 17 वर्षीय युवकावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर, नाशिकला हलवले

Lionel Messi Controversy: लिओनेल मेस्सीच्या विरोधात Fifa कडे दाखल झाली तक्रार; अर्जेंटिनाच्या सुपरस्टारवर एका सामन्याच्या बंदीची कारवाई? नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT