Bhigwan-chavare.jpg
Bhigwan-chavare.jpg 
पुणे

बोगस अंदाजपत्रक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : इंदापुर व  बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या छत्तीस चारीच्या कामाचे अधिकाऱ्यांनी बोगस अंदाजपत्रक तयार केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत '''छत्तीस चारीच्या १ ते १९ किलोमीटर अंतराच्या कामाच्या अंदाजपत्रकाची चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे'' अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्र्याकडे केली आहे. याबाबत संतोष सोनवणे व शेतकऱ्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार , १ ते १९ किलीमीटर छस्तीस चारीच्या दुरुस्तीसाठी शासनाने २०१४-१५ मध्ये ५ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी मंजुर केला होता. त्यापैकी १६ ते १९ किमीमीटर अंतराचे काम फारसे समाधानकारक न करताच ठेकेदारांना बिले अदा केली. तर, ६ ते १० किलोमीटर अंतरामध्ये दुरुस्तीचे फारसे काम नसतानाही अधिकाऱ्यांनी त्यासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. खडकवासला कालव्याच्या छस्तीस चारीच्या पाण्याची शेतकरी मागील ३० वर्षापासुन चातकाप्रमाणे वाट पहात असताना अधिकारी व ठेकेदार संगणमताने यामध्ये मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप होत आहे. या कामाची मागील दोन वर्षामध्ये अनेकदा चौकशी होऊनही काही निष्पन्न न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. छस्तीस चारीचे बोगस अंदाजपत्रक बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
    
याबाबत संतोष सोनवणे म्हणाले, ''छत्तीस चारीचे काम दर्जेदार झाल्यास या भागांतील शेतकऱ्यांच्या जीवनांमध्ये क्रांती घडुन येईल. परंतू मागील दोन वर्षापासुन या भागातील शेतकऱ्यांची थट्टा सुरु आहे. कधी निकृष्ट दर्जाचे काम तर कधी बोगस अंदाजपत्रक बनवुन शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी खेळ सुरु आहे. तातडीने बोगस अंदाजपत्रकाची चौकशी व्हावी व दोषींवर गुन्हे दाखल करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे."


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On PM Modi Offer: PM मोदींच्या सोबत येण्याच्या ऑफरवर शरद पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, 'PM मोदींमुळे....'

Hardik Pandya: हार्दिकला कसा मिळाला BCCI चा 'अ' श्रेणीचा करार? जय शाहांनी सांगितलं काय होती अट..

Mumbai Local: "एक अबोल प्रेम कथा"; 'मुंबई लोकल' मध्ये झळकणार ज्ञानदा अन् प्रथमेश परब, पोस्टरनं वेधलं लक्ष

Narendra Dabholkar Case Live Updates: अर्बन नक्षलवाद्यांचा डाव फसला, सनातन संस्थेचा आरोप

Latest Marathi News Live Update : सुधागड तालुक्यात बिबट्याची दहशत; गुरे व कुत्र्यांची करतोय शिकार

SCROLL FOR NEXT