Departure of Maratha Sangharsh Yatra from Pune to sasshtPimpal  
पुणे

''जय शिवाजी, जय भवानी!''; मराठा संघर्ष यात्रेचे पुण्यातून प्रस्थान

सकाळवृत्तसेवा

पुणे : जय शिवाजी जय भवानी.... छत्रपती शिवाजी महाराज की जय... एक मराठा लाख मराठा...चा जयघोष करीत मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा संघर्ष यात्रेचे पुण्यातून साष्टपिंपळगावकडे प्रस्थान झाले. 

मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास या यात्रेस प्रारंभ झाला. कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संघर्ष यात्रा रवाना झाली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर, रघुनाथ चित्रे पाटील, हनुमंत मोटे, किशोर मोरे, मीना जाधव, श्रुतिका पाडळे, जितेंद्र कोंढरे, सारिका कोकाटे, विनोद साबळे, अंकुश कदम, नाना निवंगुणे, अनिल ताडगे, जगजीवन काळे यांसह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक या वेळी उपस्थित होते. ही यात्रा शुक्रवारी (ता. ५) सकाळी दहा वाजता बीड येथून पुन्हा निघेल. तेथून बीड ते पाडळसिंगी, गेवराई, शहागडमार्गे जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
कुंजीर म्हणाले, ''पुणे शहर, जिल्ह्यातून तसेच रायगड, मुंबई येथून ४२ वाहनांतून ही यात्रा साष्टपिंपळगावकडे मार्गस्थ झाली आहे. जनजागृती करण्यासाठी सर्वात पुढे रथ असणार आहे. येरवडा, वाघोली, सुपा, नगर, अंमळनेरमार्गे बीडला पोचतील. ठिकठिकाणी या मोर्चाचे स्वागत झाले आहे. पोलिस प्रशासनाला मोर्चाच्या परवानगीसाठी पत्रव्यवहार केला असून, शिस्तबध्द पद्धतीने हा मोर्चा आंदोलनाकडे मार्गस्थ झाला आहे.''

चित्रे पाटील म्हणाले, ''मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा काढत आहे. साष्ठ पिंपळगावातील मराठा बांधवांनी आरक्षणासाठी सुरू केलेल्या ठिया आंदोलनाला पाठिंबा देत लढ्याला बळकटी देण्यासाठी या संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्याठिकाणी मराठवाड्यातील मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. त्याठिकाणी आंदोलनाची भूमिका ठरविण्यात येणार आहे.''

असा करा राष्ट्रीय जेईई मेन्सचा अभ्यास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT